२०२६-२७ च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यांसाठी १.४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार राज्यांना आर्थिक स्वरुपाचे नियोजन करावे लागणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांसाठी SHE MART उभारणार उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलंय की, मंदिरांसाठी ५००० कोटी रुपयांच तरतूद करण्यात आली आहे.टियर २ आणि ३ मधील शहरांना फायदा होणार आहे.
सेमी कंडक्टरसाठी ४० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, याबाबत निर्मला सितारामन यांनी घोषणा केली आहे.
देशात पाच ठिकाणी आरोग्य हब तयार करणार असल्याची माहिती निर्मला सितारामन यांनी दिली आहे.
वयोवृद्धांची काळजी घेणारी आरोग्ययंत्रणा उभारणार आहे, असं निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. वयोवृद्धांची काळजी घेण्यासाठी दीड लाख लोकांना तयार करणार असं म्हटलं आहे,
अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा झाली आहे. यामध्ये मुंबई-पुणे हायस्पीड कॉरिडोर सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ७ नवीन हायस्पीड सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.हे. पुणे -हैदराबाद कॉरिडोरचाही यामध्ये समावेश आहे.
येत्या ५ वर्षात नवीन जलमार्ग सुरु करणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. २० नवे जलमार्ग सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाराणसी, पाटण्यात जहाजबांधणी केंद्र उभारणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. ओडिशात नवे २२ जलमार्ग सुरु करणार
गुंतवणूक वाढवण्यासाठी देशांतर्गत सतत प्रयत्न सुरु आहेत, असं निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे.
आत्मनिर्भर भारत योजनेसाठी २ हजार कोटींचं टॉपअप दिले जाणार आहे. निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली आहे.
सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी १० हजार कोटी
कंटेनरच्या निर्मितीसाठी १० हजार कोटी
वस्त्रोउद्योग आणि हातमाग उद्योगाला चालना देणार
इलेक्ट्रॉनिक पार्टच्या निर्मितीसाठी ४० हजार कोटी
बायोफार्मसाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुढील ५ वर्षांसाठी भारताला बायोफार्मा हब करण्याचे उद्दिष्ट असणार आहे. यामुळे गंभीर आजारांवरील औषधांच्या किंमती कमी होणार आहेत.
कॅन्सर, एचआयवीही, मधुमेह या आजारांवरची औषधे स्वस्त करणार यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
फार्माक्युटिकल अभ्यासासाठी केंद्र तयार करणार
भारताला बायोफार्माचा हब बनवणार
आत्मनिर्भर भारत हे लक्ष्य- निर्मला सितारामन
युवकांना केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प तयार केला आहे, असं निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. आम्ही ३५० पेक्षा जास्त सुधारणा केल्या आहेत.
कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. देशात उत्पादन क्षमता वाढली आहे, असं निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे.
निर्मला सितारामन यांच्याकडून अर्थसंकल्पाचं वाचन सुरु झालं आहे. यावेळी संसदेत सर्व खासदार उपस्थित आहेत. पीएम मोदीदेखील उपस्थित आहेत.
निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली आहे. त्या नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
अर्थसंकल्पाला कॅबिनेट मंत्रिमंडळात मंजुरी दिली आहे. यानंतर आता १५-२० मिनिटांत संसदेत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत दाखल झाल्या आहेत.
अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींबाबतही निर्णय होऊ शकतो. पेट्रोल डिझेलच्या दरावर सध्या जीएसटी आकारला जात नाहीये. जीएसटी आकारण्याची मागणी केली जात होती. जर समान जीएसटी दर आकारला तर पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील. दरम्यान, याबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
बजेटआधीच रक्षा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सुरक्षा मंत्रालयाला काय मिळते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. Bharat Electronics आणि Garden Reach Shipbuilders & Enginers स्टॉक्समध्ये २ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अर्थसंकल्पात टॅक्ससंदर्भात अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे. यामध्ये जुनी कर प्रणाली रद्द केली जाऊ शकते. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आज संसदेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासाठी मंत्री शिवराज सिंह चौहान दाखल झाले आहेत.
अर्थमंत्री निर्मला सितारामन या अर्थसंकल्प सादर करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. त्याआधी आता कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये बजेटला मान्यता दिली जाणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत दाखल झाल्या आहेत. त्यांच्या हातात बजेटची प्रत आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपती मूर्मू यांची भेट घेतली आहे. ११ वाजता त्या बजेट सादर करणार आहेत.
अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केटमध्ये घसरण झाली आहे. आज सकाळी शेअर मार्केट सुरुवात होताच 82,388.97 अंकांनी घसरण झाली आहे. शेअर मार्केट सुरु होताच एका मिनिटात 86.55 अंकांनी घसरण होऊन 82,183.23 वर व्यव्हार करत आहे.
देशाच्या अर्थसंकल्पाचा थेट परिणाम हा शेअर मार्केटवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज रविवार असतानादेखील शेअर मार्केट सुरु ठेवण्यात आले आहेत.
निर्मला सितारामन आज बजेट सादर करणार आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ५.४१ लाख कोटींचे बजेट सादर होण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी त्या संसदेत पोहचल्या आहेत. थोड्याच वेळात त्या २०२६-२७ साठी अर्थसंकल्प सादर करतील.
अर्थमंत्री निर्मला सितारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. सलग नवव्यांदा त्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
चांदीचे दर गेल्या दोन दिवसांपासून कमी होत आहेत. दरम्यान, आजदेखील चांदीचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी याबाबत घोषणा होऊ शकते.
आज सर्वांचेच लक्ष देशाच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काय घोषणा होतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, अर्थसंकल्पात सोने-चांदीचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत कदाचित अर्थमंत्री निर्मला सितारामन घोषणा करु शकतात.
आज आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
आज संपूर्ण देशाचे लक्ष राजधानीकडे लागले असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) सादर करणार आहेत. जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात (Income Tax) सवलत मिळणार का, शेतीसाठी कोणत्या नव्या योजना येणार आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय पावले उचलली जाणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे. आगामी निवडणुका आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी यांवर अर्थसंकल्पात विशेष भर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Union Budget 2026: Big Expectations on Income Tax Relief, Jobs and Inflation Control
Union Budget 2026 Income Tax Slabs Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज लोकसभेत सकाळी 11 वाजता 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करतील. दरवर्षी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा यंदाही ‘एनडीए’ सरकारने कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे साप्ताहिक सुट्टीचा दिवस असूनही अर्थसंकल्प मांडला जाणारेय. शेअर बाजारही आज खुला राहणारेय. सीतारामन यांनी सादर केलेला हा सलग नववा अर्थसंकल्प असेल. नोकरदार, सामान्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांच्या आजच्या अर्थसंकल्पावर नजरा लागल्यायत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.