UPI Payment Saam Digital
बिझनेस

UPI Payment: परदेशात फिरण्यासाठी डॉलर घ्यायची गरज नाही; या देशांमध्ये UPI द्वारे करु शकणार पेमेंट

International UPI Payment: परदेशात जाण्यासाठी आपल्याला त्या देशातील चलन खरेदी करावे लागते. परंतु आता इतर देशात तुम्ही UPI द्वारे पेमेंट करु शकता. त्यामुळे तुम्हाला त्या देशातील चलन घेण्याची गरज भासणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

UPI Payments Now Accepted In many Conutries:

प्रत्येक देशाचे वेगवेगळे चलन असते. त्यासाठी परदेशात जाण्याआधी आपल्याला हे चलन खरेदी करावे लागते. परंतु आता तुम्हाला त्या देशातील चलन खरेदी करण्याची गरज भासणार नाही. जगातील काही देशांमध्ये तुम्ही UPI द्वारे पेमेंट करु शकता. मोदी सरकारने या देशांसोबत काही करार केले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने नुकतीच याबाबत घोषणा केली आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस सेवा आता श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये सुरु होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंक आणि मॉरिशसमध्ये UPI आणि RuPay ही सेवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लाँच केली आहे. त्यानंतर एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि Lyra ने महिन्याच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये UPI पेमेंट सुरु करण्याची घोषणा केली आहे. (Latest News)

UPI हा पेमेंट करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. यामध्ये युजर्स बँकेच्या खात्यातून रिअल टाइम पेमेंट करु शकतात. मागील दोन वर्षात अनेक देशांनी UPI पेमेंट स्विकारले आहे. ज्या देशांनी UPI पेमेंट लाँच केले आहेत त्या देशांची यादी जाणून घेऊया.

जगातील या देशांमध्ये UPI पेमेंट सेवा सुरु

भूटानमध्ये UPI सेवा सुरु झाली आहे. ओमानमध्ये यूपीआय पेमेंट सेवा सुरु झाली आहे. तर आशियाई देशांमध्ये मलेशिया, थायलंड, फिलिपिन्स, व्हिएतनाम, कंबोडिया, दक्षिण कोरिया, जपान, तैवान आणि हाँगकाँग या देशांमध्ये UPI पेमेंटबाबत करार करण्यात आला आहे. मॉरिशरमध्येदेखील UPI पेमेंट स्विकारले आहे. श्रीलंका, नेपाळ आणि फ्रान्समध्येदेखील तुम्ही UPI द्वारे पेमेंट करु शकता.

PhonePe द्वारे इंटरनॅशनल पेमेंट कसे कराल

  • UPI चा अॅप उघडा. त्यानंतर होम स्क्रिनवर जा.

  • तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा. त्यानंतर पेमेंट सेटिंग्जमध्ये UPI इंटरनॅशनल निवडा.

  • तुम्ही इंटरनॅशनल पेमेंटसाठी वापरत असणाऱ्या बँक खात्यावर क्लिक करा. त्यानंतर UPI पिन सेट करा. त्यानंतर पेमेंट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT