Ujjwala Scheme, Central Govt Keeps Rs 300 LPG Subsidy Alive For Beneficiaries In FY25, know the detail Saam TV
बिझनेस

LPG वर केंद्र सरकारची मोठी घोषणा, एका वर्षासाठी मिळणार 300 रुपयांची सूट; 9 कोटी महिलांना मिळणार लाभ

LPG subsidy: लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने ९ कोटींहून अधिक महिलांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति एलपीजी सिलिंडर अनुदान सवलत एका वर्षासाठी वाढवण्यास मंजुरी दिली आहे.

Satish Kengar

LPG subsidy:

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने ९ कोटींहून अधिक महिलांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति एलपीजी सिलिंडर अनुदान सवलत एका वर्षासाठी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. ही सवलत ३०० रुपये प्रति सिलिंडरवर उपलब्ध आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सरकारने १४.२ किलोच्या सिलिंडरवरील सबसिडी २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढवली होती. ही सबसिडी ३१ मार्च रोजी चालू आर्थिक वर्षासाठी होती. आता नवीन निर्णयानुसार, हे अनुदान मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याआधी या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना २०० रुपये अनुदान मिळत होते. ऑक्टोबर २०२३ मध्ये अनुदानाची रक्कम १०० रुपयांनी वाढवून ३०० रुपये करण्यात आली. भारत सरकार सध्या हे अनुदान लाभार्थ्यांना एका वर्षात १२ रिफिलवर देते. (Latest Marathi News)

२०१६ मध्ये सुरू झाली होतो योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मे २०१६ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना डिपॉझिट फ्री एलपीजी कनेक्शन दिले जाते. ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत या योजनेअंतर्गत ९.६७ कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षांत ७५ लाख एलपीजी कनेक्शन जारी करण्याच्या योजनेच्या विस्तारास मान्यता दिली आहे. ७५ लाख अतिरिक्त उज्ज्वला कनेक्शनच्या तरतुदीसह पीएममूवाय लाभार्थ्यांची एकूण संख्या १०.३५ कोटी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT