सध्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळेच सोशल मीडियाचा वापर करतात. सकाळी उठल्यापासून ते रात्रीझोपेपर्यंत याचा वापर असतो. काहींना अगदी तासभर सुद्धा सोशल मीडियापासून लांब राहता येत नाही. कारण त्यामध्ये सतत नवे कॉंटेन्ट येत असतात. काही लोक सोशल मीडियाचा वापर करूनच करोडपती झाले आहेत. ही जरी चांगली बाजू असली तरी दुसरीकडे याचा दुरुउपयोग करताना पाहायला मिळतो. पुढे आपण X म्हणजेट ट्विटरबद्दल काही महत्वाचा गोष्टी किंवा रुल्स जाणून घेणार आहोत. नाहीतर तुमचही अकाउंट डिलीट केलं जाऊ शकतं.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Twitter वर अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंटविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारत सरकारच्या आदेशनानंतर X ने तब्बल 600 अकाउंट डिलीट केले आहेत. इतकंच नाही तर 3,500 पोस्ट ब्लॉक केल्या आहेत. ही कारवाई केंद्र सरकारच्या कडक भूमिकेनंतर करण्यात आली आहे.
ANI च्या रिपोर्टनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने X वरील आक्षेपार्ह कंटेंटची दखल घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. काही अकाउंट्स Grok AI चा गैरवापर करून अश्लील फोटो आणि मजकूर तयार करत असल्याचं आढळलं होतं. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींच्या फोटोंचा वापर केल्याचे गंभीर प्रकार समोर आले होते.
या प्रकरणानंतर X चे मालक एलॉन मस्क यांनी चूक मान्य करत, भारत सरकारच्या कायद्यांनुसार काम करण्याचे आश्वासन दिले आहे. पुढील काळात X प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारच्या कंटेंटला परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Grok AI हे एलॉन मस्क यांच्या xAI कंपनीने विकसित केलेले AI चॅटबॉट आहे. हे X प्लॅटफॉर्मवर तुम्ही पर्सनल अॅपच्या मदतीने वापरु शकता. मात्र सध्या त्याच्या गैरवापरामुळे वाद निर्माण झाला होता. सरकारच्या कडक कारवाईनंतर X कडून उचललेलं हे पाऊल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.