TVS Radeon Base Edition Saam Tv
बिझनेस

69km मायलेज, 60000 रुपये किंमत; जबरदस्त आहे TVS ची 'ही' बाईक, जाणून घ्या फीचर्स

TVS Radeon Base Edition: आघाडीची दुचाकी उत्पादक टीव्हीएस मोटरने आपली नवीन TVS Radeon चा Base Edition लॉन्च केला आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Satish Kengar

सणासुदीच्या काळात आपली विक्री वाढवण्यासाठी टीव्हीएस मोटरने काही दिवसांपूर्वीच आपली कम्युटर बाईक Radeon चे सर्वात स्वस्त बेस व्हेरिएंट लॉन्च केलं. Radeon 110 ऑल-ब्लॅक कलर ऑप्शनसह लॉन्च करण्यात आली आहे. या व्हेरिएंटची कमी किंमत हा त्याचा प्लस पॉइंट आहे. ही बाईक हीरो स्प्लेंडर प्लसशी (Hero Splendor Plus) थेट स्पर्धा करते.

TVS Radeon 110 ची किंमत

TVS Radeon सध्या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, दिल्लीमध्ये त्याच्या बेस एडिशनची एक्स-शोरूम किंमत 59,880 रुपये आहे. याच्या ड्रम व्हेरिएंटची किंमत 77,394 रुपये आहे आणि डीगी डिस्कची एक्स-शोरूम किंमत 81,394 रुपये आहे.

इंजिन

TVS Radeon मध्ये 109.7 cc एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 8.19 PS पॉवर आणि 8.7Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

चांगल्या ब्रेकिंगसाठी बाईकमध्ये ड्रम आणि डिस्क ब्रेकची सुविधा आहे. Combined Braking System बाईकच्या सर्व प्रकारांमध्ये 18-इंच अलॉय व्हील आहेत. बाईकमध्ये कलर एलसीडी स्पीडोमीटर आहे, ज्यामुळे बाईकशी संबंधीत अनेक महत्त्वाची माहिती मिळते.

Hero Splendor Plus शी होणार स्पर्धा

TVS Radeon थेट Splendor Plus शी स्पर्धा करते. स्प्लेंडर प्लसची किंमत 74 हजार रुपयांपासून सुरू होते. या बाईकमध्ये 100cc इंजिन आहे. जे 7.9 bhp पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते. यात 4 स्पीड गिअरबॉक्स आहे. या बाईकमध्ये पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर आहे. तसेच यात एक यूएसबी पोर्टही आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचा फोन चार्ज करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT