Honda Activa ला पुन्हा टक्कर देण्यासाठी TVS आपली लोकप्रिय स्कूटर ज्युपिटरचा फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. सध्या फक्त ज्युपिटर 110 अपडेट केली जाऊ शकते, असं बोललं जात आहे. यावेळी त्याच्या डिझाइनमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील.
नवीन मॉडेलच्या किमतीतही थोडा फरक असू शकतो. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्युपिटर 110 मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनी ही स्कूटर नवीन अवतारात आणत आहे, तिच्या डिझाइनपासून ते इंजिन पर्यंत ही स्कूटर अपडेट केली जाऊ शकते.
नवीन ज्युपिटर 110 च्या डिझाइनमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील. याच्या नेक्स्ट नेजनरेशन स्कूटरमध्ये नवीन एलईडी हेडलाईट दिले जाऊ शकतात. याशिवाय स्कूटरच्या मागील लूकमध्ये नवीन एलईडी टेललाइट देखील दिले जाऊ शकतात.
नवीन स्कूटरमध्ये एलसीडी डिस्प्ले असेल. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधाही असेल. यामध्ये नेव्हिगेशनची सुविधाही उपलब्ध असेल. सध्याच्या मॉडेलची किंमत 73 हजार रुपयांपासून सुरू होते. मात्र नवीन स्कूटरची किंमत 5000 रुपयांपर्यंत वाढू शकते, असं बोललं जात आहे.
नवीन स्कूटर काही जुन्या आणि काही नवीन फीचर्ससह अपडेट केली जाईल. यात कॉम्बी ब्रेक, एलसीडी डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न नेव्हिगेशन, मोठी सीट, ड्रम ब्रेक आणि 21/13 इंच टायर मिळू शकतात.
ज्युपिटर 110 च्या इंजिनमध्ये कोणतेही मोठे बदल होणार नाहीत, मात्र हे ट्यून केले जाऊ शकते. यात 109.7cc इंजिन असेल. जे 7.4 bhp आणि 8.4 Nm टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन CVT गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. यात इको आणि पॉवर मोडची सुविधा असेल. नवीन स्कूटरमध्ये काही रंगांचा समावेश केला जाईल. हेच इंजिन सध्याच्या स्कूटरला देखील पॉवर देते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.