TV Channel Price Hike Saam Tv
बिझनेस

TV Channel Price Hike: आता टिव्ही पाहणे महागात पडणार; सब्सक्रिप्शनचे दर लवकरच वाढणार

TV Channel Price Hike Subscription Rate: मनोरंनाचे मुख्य साधन म्हणजे टीव्ही. परंतू अशातच टीव्ही पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण आता टीव्हीमधील काही वाहन्या महागणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. आता टिव्ही सब्सक्रिप्शनचे दर लवकरच वाढणार आहेत. आता टिव्ही पाहण प्रेक्षकांना महागात पडणार आहे. डिज्नी स्टार, व्हायकॉम18, झी एंटरटेनमेंट, सोनी पिचर नेटवर्क इंडिया ब्रॉडकास्टर त्यांच्या चॅनल सूचीमध्ये वाढ होऊ शकते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर टीव्ही पाहणे महाग होऊ शकते, असे मानले जात आहे.

किती रुपयांनी सब्सक्रिप्शन वाढणार?

रिपोर्टनुसार टीव्ही सब्सक्रिप्शन दर ५ ते ८ टक्क्यांनी वाढू शकतो. उदा. जर तुमचं महिन्याच टीव्ही सब्सक्रिप्शन ५०० रुपयांच असेल तर या किंमतीत ४० रुपयांची वाढ होऊ शकते

ट्रायने सूचित केले

ET च्या अहवालानुसार, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने ब्रॉडकास्टर्सना निवडणूक(election) संपेपर्यंत नवीन दरानुसार डिस्ट्रिब्युटर प्लेटिंग ऑपरेटरचे सिग्नल बंद करू नये असे सांगितले.

बेस बुके रेटमध्ये १० टक्क्यांनी वाढ

जानेवारीमध्ये आघाडीच्या ब्रॉडकास्टरने त्याच्या बेस बुके रेटमध्ये सुमारे 10 टक्के वाढ केली होती. अहवालानुसार, Viacom18 मध्ये सुमारे 25 टक्के वाढ होईल. याचा अर्थ सुमारे 500 रुपयांच्या मासिक सबस्क्रिप्शनमध्ये सुमारे 125 रुपयांची वाढ होईल.

किंमती लवकर वाढू शकतात

रिपोर्टनुसार, स्पोर्ट्स आणि मनोरंजनाच्या चॅनलच्या मार्केटमध्ये (market)२५ टक्क्यांने प्रगती होऊ शकते. नवीन किंमती फेब्रुवारीमध्ये लागू होणार होत्या पण आता जूनमध्ये मतदान संपल्यावर या किंमती वाढतील तसेच यासाठी ब्रॉडकास्टर्स डीपीओवर दर वाढवण्यासाठी दबाव टाकण्याची आशा आहे. एअरटेल डिजिटल टिव्ही सारख्या इतर डीपीओने आधीच थोडे दर वाढवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Daily Walking: दररोज फक्त इतकंच चाला, राहाल फिट अँड फाइन; ढिगभर फायदे आणि आयुष्यही वाढेल

Konkan Food : कोकणात बनवतात तशी चमचमीत 'वालाची आमटी', गरमागरम भाताची चव वाढवेल

CM फडणवीसांच्या सभेआधी गोळीबार, भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर ४ राऊंड फायर, CCTV व्हिडिओ व्हायरल

Grahan Dosh: 2026 नव्या वर्षात या राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर; सूर्य-राहूचा अशुभ ग्रहण योग ठरणार धोकादायक

SCROLL FOR NEXT