Traffic Rules Saam tv
बिझनेस

Traffic Rules : ३ महिनांच्या आत चालान न भरल्यास...; वाहतूक नियमात मोठा बदल, जाणून घ्या

Traffic Rules update : ३ महिनांच्या आत चलन न भरल्यास लायसन्स रद्द केले जाणार आहे. सरकारने वाहतूक नियमात मोठा बदल केला आहे.

Vishal Gangurde

आता चलन न भरणे महागात पडू शकते. तुम्ही ३ महिनांच्या आत ट्राफिक दंड न भरल्यास पोलिस तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करू शकतात. सरकारने नवीन नियमांचा मसुदा तयार केलाय. नव्या मसुद्यानुसार, ई-चलनाचा दंड तीन महिन्यात न भरल्यास चालकाचं लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे.

वर्षभरात सिग्नल तोडणे आणि धोकादायक ड्रायव्हिंगसारख्या तीन चुका केल्यास लायसन्स थेट तीन महिन्यांसाठी जप्त करण्याचा प्रस्ताव आहे. ट्राफिक पोलीसांकडून दरवर्षी ई-चालान जारी केले जातात. त्यापैकी एकूण फक्त ४० टक्के लोकांकडून दंड भरला जातो. यामुळे सरकारला वसुली वाढवायची आहे. कठोर नियमांमुळे लोक चालान भरण्याविषयी गंभीर होतील, असा सरकारचा विश्वास आहे. ज्या चालकाचे दोन चालान थकीत असतील. त्यांच्या वाहनाच्या विमा प्रीमियम वाढवण्याचा विचार सुरु आहे.

दंड न भरल्यास पेनल्टी नाही आणि लोक अदालतीत चलनावर सुटही मिळते. त्यामुळे लोकांकडून मुद्दाम दंड भरला जात नाही. सुप्रीम कोर्टानं सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून चलन आणि त्यांच्या भुगतानाविषयी रिपोर्ट मागवला होता. देशाची राजधानी दिल्लीत सर्वाधिक चलन होतात. पण एकूण १४ टक्के लोकांकडून दंड भरला जात नाही.

उत्तर प्रदेशात हा आकडा २७ टक्के आहे. तर ओडिशात एकूण २९ टक्के आहे. इतर राज्यांतही अशीच परिस्थिती पाहायला मिळते. या कारणात्सव नियम कडक केला जात आहे. नियम कडक केल्याने चालकांना शिस्त लागेल, या अनुषंगाने सरकारने नियम कडक केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपूर हादरले, ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू, भाचीला वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचेही निधन

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

Leopard : पुण्यानगर नगरमध्येही बिबट्याचा हल्ला, ४ वर्षाच्या चिमुकलीचा घेतला बळी

Bihar Elections : बिहारमध्ये १२१ जागांसाठी आज मतदान, तेजस्वी-सम्राट यांच्यात थेट सामना, तर भाऊ तेज प्रतापची स्वतंत्र लढत

RBI नं विकलं 35 टन सोनं? 60 हजार कोटींचं काय केलं?

SCROLL FOR NEXT