Tractor Price Saam Tv
बिझनेस

Tractor Price: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ट्रॅक्टरच्या किंमती ६० हजारांनी कमी होणार, घटस्थापनेपासून नवे दर

Tractor Price Decrease After GST Reforms: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहे. यामुळे कृषी यंत्रे, ट्रॅक्टरच्या किंमती कमी होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

ट्रॅक्टरच्या किंमती कमी होणार

कृषी यंत्रणावरील जीएसटी ५ टक्क्यांवर

जीएसटीमध्ये कपात केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. जीएसटीमध्ये कपात झाल्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जीएसटीमध्ये कपातीचा थेट परिणाम कृषी यंत्रणाच्या किंमतीवर होणार आहे. ट्रॅक्टरच्या किंमतीत जवळपास ६० हजारांपर्यंत कपात होणार आहे. याचसोबत इतर कृषी यंत्रणांच्याही किंमती कमी होणार आहे.

जीएसटीमध्ये कपात झाल्यानंतर ट्रॅक्टरच्या किंमती ६२ हजारांनी कमी होणार आहेत. इतर कृषी यंत्रणाच्या किंमती पावणेदोन लाख रुपयांपर्यंत कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतीसाठी उपयोगी सर्व यंत्रणांच्या किंमती कमी होणार आहेत.

येत्या २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी कर लागू करणार आहेत. दरम्यान, कृषी यंत्रणांवरील किंमती कमी होणार आहेत परंतु कितीने याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. २२ सप्टेंबर रोजी याबाबतच सर्व चित्र स्पष्ट होईल.सध्या यंत्रे व अवजारे उत्पादक माल पुरवठादारांकडील किंमत सूचीची वाट पाहत आहेत, अवजारे तयार करण्यासाठी सूटे भाग लागतात. त्यावर आता पुरवठादार किती सूट देतात, हे सुधारित कोटेशनमधून लक्षात येणार आहे. यामुळे कोटेशनमधील आकडे आणि निर्मितीचा खर्च या सर्व गोष्टी लक्षात घेऊन किंमत किती कमी करायची, याचा निर्णय उत्पादक घेणार आहेत.

अॅग्रीकल्चर मिशनरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भरत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. कृषी यंत्रे आणि अवजारांवरील जीएसटी आता ५ टक्के करण्यात आला आहे.यामध्ये ७ टक्के सवलत मिळाली आहे. मात्र, सुट्या भागांवर जीएसटी सूट दिलेली की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यामुळेच उत्पादक उद्योगा संभ्रमात आहे. त्यामुळे किंमती किती कमी होणार याबाबत संभ्रम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dadpe Pohe Recipe: सकाळच्या नाश्त्याला घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट दडपे पोहे; वाचा सोपी रेसिपी

Heart Attack Symptoms : सकाळी उठताच दिसतात हॉर्ट अॅटकची ही ६ लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचे तांडव! मुंबई-ठाण्यासह ४ जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', ९ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार

Maharashtra News Live Update: मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट

Sunday Horoscope: दिवस धावपळीचा राहील; ५ राशींच्या व्यक्तींनी रागावर ठेवा नियंत्रण; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT