women schemes India GOOGLE
बिझनेस

Women Schemes In Maharashtra: लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या या TOP 5 सरकारी योजना जाणून घ्या

Government Yojana: महिलांसाठी सरकारच्या ५ महत्वाच्या योजना जाणून घ्या. नोकरी आणि कर्जाची संधी मिळते.

Sakshi Sunil Jadhav

सध्या महागाईचं प्रमाण वाढत चाललं आहे. घरात जर एकच कमवती व्यक्ती असेल तर खर्चाला पैसेही पुरत नाहीत. त्याचाच विचार करुन केंद्र सरकार अनेक योजना राबतं. त्याचा मुळ उद्देश हा महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं असा असतो. बऱ्याच महिलांना अनेक योजनांबद्दल माहिती नसते. पुढील बातमीत आपण महिलांसाठी सुरु असणाऱ्या 5 सरकारी योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.

जननी सुरक्षा योजना

ज्या गर्भवती महिलांना त्यांच्या प्रसुतीच्या काळात पैशांच्या अडचणी येतात. त्यांच्यासाठी ही खास योजना राबवली जाते. यामध्ये महिलांना मोफत तपासणी आणि प्रसूतीसाठी आर्थिक मदतही केली जाते. तर ग्रामीण भागातल्या महिलांना १४०० रुपये आणि शहरी भागातल्या महिलांना १००० रुपयांची मदत मिळते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना आहे. यामध्ये पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत मिळते. हेच पैसे वाढत्या महागाईसाठी खूप गरजेचे ठरू शकतात.

विधवा पेन्शन योजना

ज्या महिला आर्थिकदृष्ट्या कमजोर असतात. त्यांच्यासाठी सरकारने विधवा पेन्शन योजना सुरु केली आहे. यामध्ये महिलांसोबत त्यांच्या अपत्यांचा विचार करुन मदत केली जाते. म्हणजेच यामध्ये गरजू महिलांना ६०० रुपयाची पेन्शन तर महिलेला मुलं असतील तर ९०० रुपयांची पेन्शन दिली जाते.

LIC विमा सखी योजना

ज्या महिलांना आर्थिक अडचणी असतात, त्यांच्यासाठी या योजनेत नोकरीची संधी मिळते. यात स्टायपेंड ७००० रुपयांमर्यंत मिळतं. तसेच LIC विमा सखी योजनेत महिलांना एजंट बनण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.

लखपती दीदी योजना

जर एखाद्या महिलेला उत्पन्नात वाढ करण्यासाठी व्यवसाय सुरु करायचा असेल तर ही योजना महत्वाची आहे. तुम्हाला यामध्ये ५ लाखांपर्यंतचे लोन दिले जाते. या योजनेचा उद्देश हा महिलांना स्वावलंबी बनवण्याचा आहे.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT