Salary Increment, Salary Hike 2024 Saam Tv
बिझनेस

Salary Hike 2024 : यंदा नोकरदारांच्या पगारात होणार भरघोस वाढ! किती वाढणार तुमची सॅलरी?

Salary Hike Expectations खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काही ठिकाणी अनेक कर्मचारी कपात करण्यात आले आहे. सध्या पगारवाढीचा काळ असल्यामुळे अनेक नोकरदारांचे लक्ष किती टक्क्यांनी पगार वाढेल याकडे आहे.

कोमल दामुद्रे

6 to 12 Percent Salary Hike In Corporate Sector:

खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काही ठिकाणी अनेक कर्मचारी कपात करण्यात आले आहे. सध्या पगारवाढीचा काळ असल्यामुळे अनेक नोकरदारांचे लक्ष किती टक्क्यांनी पगार वाढेल याकडे आहे.

मिंट, शाइन टॅलेंट, इनसाइट्सच्या अहवालानुसार सर्वेक्षण केलेल्या ३४ टक्के एचआर अधिकाऱ्यांनी सांगितले की, यंदा पगारवाढ (Salary) अपेक्षित आहे. यामध्ये कर्मचाऱ्याचे (Employee) मनोबल वाढवणे आणि त्यांची कामाप्रति निष्ठा टिकून राहाणे गरजेचे आहे.

जानेवारी ते मार्च या काळात केलेल्या त्रैमासिक अभ्यासादरम्यान तीन हजारहून अधिक एचआर अधिकारी आणि नोकरी शोधणाऱ्य़ांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ४९ टक्के भर्ती करण्या येणाऱ्या नोकरदारांबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केल्या.

नवीन नोकरदारांमध्ये अंदाजे 25%, 6-8% च्या अधिक मध्यम वाढीची योजना आहे. यात कंपनीच्या यशात योगदान देणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्य़ांचे मूल्य मान्य करते असे अहवालात म्हटले आहे.

सर्वेक्षणानुसार नोकरी शोधणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये २४ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना १० ते १५ टक्क्यांनी पगारवाढीची अपेक्षा आहे. तर आणखी २४ टक्के लोकांनी २० टक्के पगारवाढीची अपेक्षा सांगितली आहे. यावरुन असे दिसून येते की, कर्मचाऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त पगारवाढ हवी आहे.

भारत इंकने मागच्या वर्षभरात नोकरदारावर वर्गात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. २०२१ आणि २०२२ च्या सुरुवातीच्या काळात विविध क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या पारंपारिक व्यवसायांना डिजिटल व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी अत्यंत वेगाने काम केले. यामध्ये २०२२ मध्ये ढासळलेली आर्थिक स्थिती, भू-राजकीय तणाव आणि खाजगी इक्विटी कंपन्या त्यांची गुंतवणूक कमी करत आहेत याचा परिणाम आयटी, स्टार्टअप आणि रिटेल उद्योगांवर झाला.

काही कंपन्या त्यांच्या कोलमडलेल्या बजेटमुळे नोकरदारांना ०ते २ टक्के पगारवाढ देतात ज्यामुळे ते अडचणीत येतात. टाटा स्टील सारख्या कंपन्यांनी त्यांच्या मूल्यमापन प्रक्रियेत आणि कर्मचाऱ्याने केलेल्या चांगल्या कामगिरी करणाऱ्या अधिक चांगली संधी देण्याचे काम करते आहे. टाटा स्टीलचे मानव संसाधन यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

Yogesh Kadam on Ghaywal Gang : गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कुणी दिला? मंत्री योगेश कदम यांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT