Bank FD Schemes Saam Tv
बिझनेस

Bank FD Scheme: 'या' तीन बँक एफडीमध्ये गुंतवणुकीवर देत आहेत भरघोस व्याजदर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

FD Scheme News: 'या' तीन बँक एफडीमध्ये गुंतवणुकीवरदेत आहेत भरघोस व्याजदर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Satish Kengar

Bank FD Rates: 

सगळ्यांनाच आपले पैसे कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवायचे आहेत आणि त्यावर चांगला परतावा मिळवायचा आहे. मात्र माहितीच्या अभावामुळे अनेकजण चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवतात. गुंतवणुकीसाठी FD ही देशातील बहुतांश लोकांची गुंतवणुकीची पहिली पसंती आहे.

मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने बाजारातील जोखीम समोर येत नाहीत. जर तुम्हालाही तुमची बचत FD योजनेत गुंतवायची असेल. अशा परिस्थितीत ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या तीन बँकांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला गुंतवणुकीवर उत्कृष्ट व्याजदर मिळतात. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्टेट बँक ऑफ इंडिया

सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये FD वर सर्वाधिक व्याजदर 7.1 टक्के आहे. ही बँक तुम्हाला एका वर्षाच्या एफडीवर 6.8 टक्के, दोन वर्षांच्या एफडीवर 6.5 टक्के आणि पाच वर्षांच्या एफडीवर 6.5 टक्के व्याजदर देत आहे. (Latest Marathi News)

बँक ऑफ इंडिया

तुम्हाला बँक ऑफ इंडियाच्या FD मध्ये गुंतवणूक करायची असल्यास. ही बँक FD वर सर्वाधिक 7.25 टक्के व्याज देत आहे. या बँकेत तुम्हाला एका वर्षाच्या एफडीवर 6.50 टक्के, दोन वर्षांच्या एफडीवर 6.50 टक्के आणि पाच वर्षांच्या एफडीवर 6 टक्के व्याजदर मिळत आहेत.

बँक ऑफ बडोदा

ही बँक मुदत ठेवींवर सर्वाधिक 7.25 टक्के व्याज देत आहे. ही बँक पाच वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे. तीन वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के व्याजदर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water: गोड पाणी असणारा नारळ कसा ओळखायचा? वाचा १ सोपी ट्रिक

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

iran and israel war News : गॅसनं वाढवलं तळीरामाचं टेन्शन; देशात दारुचा दुष्काळ पडणार?

SCROLL FOR NEXT