Post Office Schemes 
बिझनेस

Post Office: महिलांसाठी वरदान आहेत पोस्ट ऑफिसच्या 'या' योजना; गुंतवणुकीवर बँकेपेक्षाही मिळतं जास्त व्याज

Post Office Schemes : पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीच्या काही योजना आहेत, ज्या फक्त महिलांसाठी राबवण्यात येतात. यात तुम्हाला बँकेतील मुदत ठेवींपेक्षा जास्त व्याजदर मिळत असतो.

Bharat Jadhav

पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याच्या अनेक योजना आहेत. या योजना महिलांसाठी वरदान ठरणाऱ्या आहेत.पोस्ट ऑफिस बचत योजना महिला गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय ठरतात. या योजना केवळ सामाजिक सुरक्षासह बँकांच्या तुलनेत चांगला परतावादेखील देतात. महिलांसाठी सर्वोत्तम असलेल्या पोस्ट ऑफिसच्या ५ महत्त्वाच्या बचत योजनांबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

सुकन्या समृद्धी बचत योजना

मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुरू करण्यात आलीय. मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी असताना तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत वार्षिक ८.२% व्याजदर मिळतो. खाते उघडल्यानंतर ही योजना १५ वर्षे चालवता येते. या योजनेतील सर्वात मोठा फायदा म्हणजे, यामधील गुंतवणुकीवर कलम ८०सी (80C) अंतर्गत कर सवलत मिळते. यामुळे तुम्हाला दुहेरा फायदा होतो.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना

ज्या महिलांना दरमहा नियमित उत्पन्न हवे आहे, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. या योजनेत तुम्ही किमान १००० रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत ७.४% वार्षिक व्याजदर मिळते. निवृत्त महिला किंवा ज्यांना नियमित मासिक उत्पन्नाची गरज आहे, त्यांच्यासाठी ही योजना एक चांगला आधार बनू शकते.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

ही योजना महिला गुंतवणूकदारांसाठी चांगली आहे, या योजनेत जोखीम नसते. विशेष म्हणजे सर्व वयोगटातील महिला या योजनेत गुंतवणूक करू शकतात. तुम्ही या योजनेत एका खात्यात जास्तीत जास्त २ लाख रुपये जमा करू शकता. तुम्हाला वार्षिक ७.५% इतके व्याज मिळत असते. एक वर्षानंतर तुम्ही तुमच्या जमा केलेल्या रकमेतील ४०% पर्यंत पैसे काढू शकता. ज्यामुळे तुम्हाला गरजेच्या वेळी पैशांची उपलब्धता राहत असते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे. यात तुम्ही किमान १०० रुपये पासून गुंतवणूक करू शकता. या योजनेची मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांची आहे आणि यावर ७.७% चक्रवाढ वार्षिक व्याजदर दिला जातो. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना

पीपीएफ ही योजनासुद्धा गुंतवणुकीसाठी चांगली आहे. यामध्ये किमान ५०० रुपये गुंतवणूक करावी लागते, त्यावर वार्षिक ७.१% व्याजदर मिळत असते. ही योजना १५ वर्षांची असली तरी, त्यात तुम्हाला कर सवलतीचा 80C अंतर्गत फायदा मिळत असतो. यासर्व पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करून, महिला त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकतात. आर्थिकदृष्ट्या अधिक स्वावलंबी बनू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

SCROLL FOR NEXT