Who is World Richest Women Saam TV
बिझनेस

World Richest Women: जगातील सर्वात श्रीमंत महिला, कमाईत अदानी-अंबानींना टाकलं मागे; एकूण संपत्ती किती?

Satish Daud

Who is World Richest Women

जगभरातील श्रीमंत व्यक्ती कोण? असं विचारलं तर, अनेकांच्या तोंडी एलन मस्कचं नाव येतं. पण, सर्वात श्रीमंत महिला कोण? असा प्रश्न जर विचारला तर अनेकजण विचारात पडतात. आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका श्रीमंत महिलेच्या बाबतीत सांगणार आहोत, ज्यांनी संपतीच्या बाबतीत मुकेश अंबानी, गौतम अदानी यांच्यासह अब्जाधीश उद्योगपतींना मागे टाकलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलन मस्क, जेफ बेझोस, बिल गेट्स, बर्नार्ड अर्नॉल्ट, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांचा समावेश आहे. पण महिलांच्या बाबतीत पहिला क्रमांक येतो, तो फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर्स यांचा.

मेयर्स या फ्रान्सचे रहिवासी असून त्या एका मेकअप मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या अध्यक्षा आहेत. फ्रँकोइस लॉरियलच्या संस्थापकाच्या त्या नात आहेत. लॉरियल हे जगातील आघाडीचे कॉस्मेटिक ब्रँड आहे. (Latest Marathi News)

मेयर्स यांची एकूण संपत्ती १०० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. त्यांनी संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी आणि गौतम अदानींना देखील मागे टाकलं आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत त्या १२ व्या स्थानावर आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत महिला असण्यासोबतच मेयर्स एक चांगल्या लेखिका देखील आहेत. त्यांना जगातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठा कॉस्मेटिक्स ब्रँड लॉरियलचा वारसा मिळाला आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये मेयर्स यांच्या कंपनीची एकूण कमाई ४१.९ अब्ज डॉलर इतकी होती. यावर्षी त्यात तब्बल ३४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मेसर्स १९९७ पासून लॉरिअलच्या संचालक मंडळावर आहेत.

सप्टेंबर २०१७ मध्ये आईच्या निधनानंतर त्याने अब्जाधीशांच्या यादीत प्रवेश केला. आज त्या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे. याशिवाय फ्रान्समधील श्रीमंतांच्या यादीत त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बर्नार्ड अर्नॉल्ट हे फ्रान्समधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT