TESLA MODEL Y UNDER INVESTIGATION AFTER PARENTS FORCED TO BREAK WINDOWS TO RESCUE KIDS 
बिझनेस

Tesla Model Y: महागडी टेस्ला कार वादात, काचा फोडून मुलांना काढावे लागले बाहेर, आता १.७४ लाख गाड्यांची चौकशी होणार

NHTSA Investigation: टेस्ला मॉडेल वाय भारतात लाँच झाली असून किंमत ५९.८९ लाख रुपयांपासून सुरू होते. हाय-टेक फीचर्ससह ही कार NHTSA ने १.७४ लाख वाहनांसाठी चौकशी अंतर्गत ठेवली आहे.

Dhanshri Shintre

  • टेस्लाच्या १.७४ लाख मॉडेल Y कारवर इलेक्ट्रॉनिक दरवाज्यांच्या हँडलच्या बिघाडामुळे तपासणी.

  • नऊ घटना नोंदल्या गेल्या असून चार प्रकरणांमध्ये पालकांना खिडक्या फोडाव्या लागल्या.

  • समस्या लो-व्होल्टेज बॅटरीमुळे निर्माण होते, मात्र सूचना दिल्या जात नाहीत.

  • मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाल्याने टेस्लासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

एलोन मस्कच्या नेतृत्वाखालील अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला पुन्हा अडचणीत सापडली आहे. लाखो रुपये मोजून खरेदी केलेल्या या हाय-टेक कारबद्दल पालकांनी गंभीर तक्रारी नोंदवल्या आहेत. गाडी चालवताना सर्व काही सुरळीत दिसते. पण प्रवासी गाडीतून उतरल्यानंतर जेव्हा मागच्या दरवाजाने मुलांना उचलण्यासाठी जातात, तेव्हा दरवाज्याचे हँडल अचानक काम करणे थांबवते. परिणामी, काही पालकांना आपल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी कारची काच फोडावी लागली आहे.

या परिस्थितीमुळे अमेरिकन ट्रॅफिक सेफ्टी एजन्सी नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NHTSA) ने मोठे पाऊल उचलले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, NHTSA ने टेस्लाच्या १.७४ लाख मॉडेल Y कारची तपासणी सुरू केली आहे. या कार २०२१ मध्ये तयार करण्यात आल्या होत्या आणि त्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक डोअर हँडलमध्ये गंभीर बिघाड झाल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.

एजन्सीपर्यंत पोहोचलेल्या तक्रारींमधून समोरील सत्य धक्कादायक आहे. किमान ९ अशा घटना नोंदवण्यात आल्या आहेत ज्यात कारचा दरवाजा उघडत नव्हता. त्यापैकी चार प्रकरणांमध्ये पालकांनी अक्षरशः खिडकी फोडून मुलांना बाहेर काढले. तपासात असेही स्पष्ट झाले आहे की ही समस्या गाडीच्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीमला आवश्यक व्होल्टेज न मिळाल्यामुळे होते. म्हणजेच लो-व्होल्टेज बॅटरीमुळे हँडल बंद पडते. मात्र या संभाव्य त्रुटीची सूचना चालकांना आधीपासून मिळत नाही.

टेस्ला वाहनांमध्ये मॅन्युअल डोअर रिलीजचा पर्याय देण्यात आला असला तरी तो लहान मुलांसाठी उपयोगाचा नाही. त्यामुळेच या कारमधील मूलभूत सुरक्षिततेबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत. उच्च-तंत्रज्ञान आणि लक्झरी वैशिष्ट्यांच्या आडून जर प्रवाशांच्या सुरक्षेवर तडजोड होत असेल, तर ती संपूर्ण इलेक्ट्रिक कार उद्योगासाठीही चिंतेची बाब आहे.

कोणत्या टेस्ला कार्समध्ये ही समस्या आढळली आहे?

ही समस्या टेस्लाच्या २०२१ मध्ये बनवलेल्या मॉडेल Y कार्समध्ये आढळली आहे.

पालकांनी कोणत्या अडचणी सांगितल्या आहेत?

पालकांनी सांगितले की दरवाज्याचे हँडल अचानक काम करणे थांबते आणि मुलांना बाहेर काढण्यासाठी कारची काच फोडावी लागली.

तपासणी कोण करत आहे?

अमेरिकेची नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन (NHTSA) या प्रकरणाची चौकशी करत आहे.

 पुढे टेस्लाविरुद्ध कोणती कारवाई होऊ शकते?

जर दोष गंभीर आढळला तर NHTSA रिकॉल प्रक्रिया सुरू करण्याची शिफारस करू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT