Layoffs 2024  Saam Tv
बिझनेस

Tech Layoff: नववर्षात तरुणाईला तगडा झटका; १० मोठ्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tech Layoffs Google Microsoft Flipkart

यावर्षी पहिला महिनाही उलटला नाही तोच जगभरातील अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामावरून कमी करण्याची घोषणा केलीय. मायक्रोसॉफ्ट, गुगल, यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी 1,000 पेक्षा जास्त नोकऱ्या कमी केल्या आहेत. (Maharashtra News)

तंत्रज्ञान कंपन्यांसाठी 2024 वर्षाची सुरुवात खराब झाली आहे. जगभरातील 115 तंत्रज्ञान कंपन्यांनी जानेवारी 2024 मध्ये नोकऱ्या (Tech Layoffs 2024) कमी केल्या आहेत. या कंपन्यांच्या नावांमध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. दहा कंपन्यांनी जानेवारी 2024 मध्ये 1,000 पेक्षा जास्त नोकऱ्या कमी केल्या आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेऊ या.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

  • गुगल (Google)

    गुगलने 10 जानेवारी रोजी 1000 नोकऱ्या कपातीची घोषणा केली. Googleचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना 2024 मध्ये आणखी टाळेबंदी होऊ शकते, असा इशाराही दिली आहे.

  • मायक्रोसॉफ्ट (Microsoft)

    मायक्रोसॉफ्टने 25 जानेवारी रोजी नोकऱ्या कमी केल्याची घोषणा केली होती. त्यांनी 1900 कामगारांना कंपनीतून बाहेर पडण्यास सांगितलं.

  • फ्लिपकार्ट (Flipkart)

    ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने 8 जानेवारी रोजी 1100 कर्मचाऱ्यांना काढून टाकले. याचा 5 टक्के कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे.

  • युनिटी (Unity)

    गेम इंजिन डेव्हलपर कंपनी युनिटीने 8 जानेवारी रोजी 1800 कामगारांना काढून टाकलं. याचा परिणाम 25 टक्के कर्मचाऱ्यांवर झाला आहे.

  • सायट्रिक्स (Citrix)

    क्लाउड कॉम्प्युटिंग आणि सॉफ्टवेअर फर्म सायट्रिक्सने 10 जानेवारी रोजी 1000 नोकऱ्या कमी केल्या. त्यांनी मनुष्यबळात 12 टक्के कपात केली आहे.

  • वेफेअर (Vayfair)

    यूएस-आधारित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वेफेअर होम डेकोरचे काम करते. त्यांनी 19 जानेवारी रोजी 1650 कर्मचाऱ्यांना काढून टाकले. 13 टक्के कंपनीचे कर्मचारी कमी केले.

  • eBay

    ई-कॉमर्स कंपनी eBayने 23 जानेवारी रोजी 1000 नोकऱ्या कपातीची घोषणा केली. त्यांनी 9 टक्के कर्मचारी कमी केलं आहे.

  • SAP

    SAPया जर्मनी-आधारित सॉफ्टवेअर कंपनीने 8,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यांनी मनुष्यबळात 7 टक्के कपात केली आहे.

  • ब्लॉक (BLOCK)

    Twitter चे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांच्या फिनटेक स्टार्टअपने 30 जानेवारी रोजी 1,000 नोकऱ्या कमी केल्या. याचा 10 टक्के कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे.

  • पेपल (Paypal)

    एकेकाळी अब्जाधीश एलोन मस्कच्या मालकीच्या फिनटेक कंपनीने 2500 नोकऱ्या कमी केल्या आहेत. त्यांनी 9 टक्के कर्मचारी कमी केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT