Tax Saving Investment Saam Tv
बिझनेस

Tax Saving Investment: 'या' योजनांमध्ये गुंतवणूक करा, तुमचा टॅक्स वाचेल अन् मुलाच्या भविष्याची चिंता मिटेल

Tax Saving Tips: प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. जर तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुमचा टॅक्सही वाचेल.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी, शिक्षणासाठी आर्थिक बचत करतात. काही योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही टॅक्स वाचवू शकतात. इन्कम टॅक्स कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते. काही योजनांमध्ये कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांवर टॅक्स सूट मिळते.

तुम्ही मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, एनएससी, एफडी या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत चांगला परतावा मिळतो. त्याचसोबत चांगला परतावादेखील मिळतो. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी चांगले पैसे जमा करु शकतात.

सुकन्या समृद्धी योजना

तुम्ही लहान मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना किंवा पीपीएफमध्ये गुंतवणूक करतात.या योजनांमध्ये कलम 80C अंतर्गत १.५ लाखांवर कर सूट मिळते. या योजनेत व्याज आणि मॅच्युरिटी अमाउंटवर कोणताही टॅक्स लागत नाही. सुकन्या समृद्धी योजना फक्त मुलींसाठी आहे.

राष्ट्रीय सेव्हिंग पत्र

तुम्ही राष्ट्रीय सेव्हिंग पत्र या योजनेत गुंतवणूक करु शकतात. यामध्ये कलम 80C अतंर्गत १.५० लाखांची सूट मिळते. आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्येही टॅक्स सूट मिळते. या योजनेत १०,००० रुपयांपर्यंतच्या व्याजावर सूट मिळते.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम

या योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो. जर तुम्हाला टॅक्स वाचवायचा असेल तर ELSS म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा. यामध्ये तुम्हाला कलम 80C अतंर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळते.

युनिट लिंक्ड इन्श्युरन्स प्लान

या योजनेत तुम्हाला गुंतवणूकीसोबत विमा कव्हर मिळतो. यामध्येही कलम 80C अतंर्गत १,५ लाखांपर्यंत कर सूट मिळते.या योजनेत मॅच्युरिटी आणि डेथ बेनिफिट टॅक्स फ्री असणार आहे.

टॅक्स फ्री बॉन्ड

टॅक्स फ्री बॉन्ड चांगले रिटर्न देतात.यावर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. या योजनेत कलम 80CCD(1B)अंतर्गत अतिरिक्त सूट मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haldi Kunku Gift Idea : बेस्ट हळदी–कुंक वाण आयडिया, उपयोगी आणि बजेटमध्ये बसणाऱ्या खास वस्तू

Leopard News : बिबट्या अकोल्यात पोहचला, बाळापूरमध्ये ४ पिल्लांसह आढळला, एक शेतकर्‍याच्या हाती लागले, पण...

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

Lagnanantar Hoilach Prem Video : जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याचा संसार मोडला? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT