Income Tax Refund Saam Tv
बिझनेस

Tax Refund: आयटीआर भरला पण अजूनही रिफंड जमा झाला नाही? ही असू शकतात कारणे; अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Tax Refund Delayed Reason: आयटीआर फाइल करण्याची मुदत संपली आहे. दरम्यान, आतापर्यंत अनेकांच्या खात्यात रिफंडचे पैसे जमा झालेले नाहीत. हे पैसे का जमा झाले नाहीत त्यामागची कारणे वाचा.

Siddhi Hande

आयटीआर फाइल करण्याची मुदत संपली

टॅक्स रिफंड न जमा होण्यामागची कारणे

कधीपर्यंत जमा होणार टॅक्स रिफंड

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. आतापर्यंत अनेकांनी आयटीआर फाइल केले आहे. काही जणांनी आयटीआर फाइल केले नाही त्यामुळे त्यांना बिलेटेड आयटीआर फाइल करावा लागेल. दरम्यान, ज्या लोकांनी आयटीआर फाइल केला आहे त्यांना रिफंड जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान,अनेकांचे रिफंड जमा झाले नाहीत. त्यामुळे अनेक करदात्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

किती दिवसात जमा होणार रिफंड? (How Many Days To Get ITR Refund)

जेव्हा आयटीआर वेरिफाय केले जाईल त्यानंतर रिफंडची प्रोसेस सुरु होईल. २ ते ५ आठवड्यांमध्ये करदात्यांच्या खात्यात रिफंडचे पैसे जमा केले जातात.जर तुम्ही नॉर्मल आयटीआर फाइल केला असेल तर एका आठवड्यातदेखील रिफंडचे पैसे येतील. दरम्यान, जर तुमचे ऑडिट असेल बिझनेस इनकम, कॅपिटल गेन यासारखे डिडक्शन क्लेम असेल तर त्यासाठी ३-४ आठवडे लागू शकतात.

रिफंड उशिरा होण्याची कारणे (ITR Refund Delay Reasons)

टॅक्स रिफंड उशिरा येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यातील एक कारण म्हणजे बँक अकाउंट प्री वॅलिडेट न होते. बँक खात्यावरील नाव आणि पॅन कार्डवरील नाव मॅच न होणे. चुकीचा IFSC टाकणे. तसेच आयटीआर भरल्यानंतर बँक खाते बंद झाले तर तुम्हाला रिफंड येण्यास उशिर होऊ शकतो. टीडीएस डेटा मॅच न होणे, या कारणांमुळे रिफंड जमा होण्यास उशिर होतो.

आयटीआर रिफंड स्टेट्‍स कसा चेक करायचा? (ITR Refud Status)

सर्वात आधी तुम्ही www.incometax.gov.iवर जाऊन लॉग इन करा.

यानंतर Services मध्ये जाऊन Know Your Refund Status वर क्लिक करा.

यानंतर View Filed Returns वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला या आर्थिक वर्षाचे रिफंड स्टेट्‍स दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT