Tata Tech IPO Listing Saam Tv
बिझनेस

Tata Tech IPO Listing : टाटा टेकच्या IPO मुळे गुंतवणूकदार मालामाल; किरकोळ गुंतवणुकीवर काही तासांत लाखोंची कमाई

Tata Tech IPO Price : टाटा कंपनीचा शेअर तब्बल १९ वर्षांनंतर शेअर बाजारात लिस्ट झाला. २००४ मध्ये टीसीएसच्या लिस्टिंगनंतर आता टाटा टेकच्या शेअर्सने आज शेअर बाजारात प्रवेश केला आहे. या शेअरमुळे गुंतवणूकदार काही तासात मालामाल झाले आहे.

कोमल दामुद्रे

Tata Tech IPO :

टाटा कंपनीचा शेअर तब्बल १९ वर्षांनंतर शेअर बाजारात लिस्ट झाला. २००४ मध्ये टीसीएसच्या लिस्टिंगनंतर आता टाटा टेकच्या शेअर्सने आज शेअर बाजारात प्रवेश केला आहे. या शेअरमुळे गुंतवणूकदार काही तासात मालामाल झाले आहे.

टाटा टेकच्या शेअरला गुंतवणूकदारांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. २२ नोव्हेंबर २०२३ ते २४ नोव्हेंबर २०२३ या दरम्यान टाटा टेकचा आयपीओ विक्रीसाठी बाजारात आला होता. त्याची फेस वॅल्यू २ रुपये पर शेअर होती. याची ब्रँड किंमत ४७५ रुपये ते ५०० रुपये दरम्यान होती. १५०० हजार रुपयांच्या लॉटमध्ये ३० शेअरची विक्री करण्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आयपीओ लिस्टिंग झाल्यानंतर आयपीओ एकूण ६९ पेक्षा जास्त पट सब्स्क्राईब झाला. आज या शेअरने बीएसईवर 1199.95 च्या किंमतीवर (Price) व्यवहार सुरु केला. यामुळे गुंतवणूकदारांना १३९.९९ टक्क्यांचा लिस्टिंग गेन झाला आहे. शेअर बाजारात ही तेजी कायम असून याची किंमत १३९८ रुपयांपर्यंत पोहोचली.

पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी (Investment) १४० टक्के चा बंपर नफा कमावला आहे. टाटा (Tata) टेक आयपीओच्या लिस्टिंगचा गुंतवणूकदारांना कसा फायदा झाला. कॅलक्युलेशन कसे केले जाते. याविषयी जाणून घेऊया.

1. टाटा टेक IPO लिस्टिंग नफा

  • इश्यू प्राइज : ५०० रुपये

  • लिस्टिंग प्राइज : ११९९.९५

  • लॉट साइज : ३० रुपये

  • लिस्टिंग प्रॉफिट : २१००० रुपये/ लॉट

2. टाटा टेक आयपीओची विक्री

  • IPO तारीख : २२ ते २४ नोव्हेंबर २०२४

  • इश्यू प्राइज : ५०० रुपये/ शेअर्स

  • इश्यू साइज : ३०४२.५ करोड रुपये

  • लॉट साइज : ३० शेअर्स

  • सब्सक्रिप्शन : ६९.४३ वेळा

DISCLAIMER : शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update : मनोज जरांगेंवर कारवाईची मागणी; धनंजय मुंडेंना ओबीसी कार्यकर्त्यांचा दुग्धाभिषेकाने समर्थन

Couple Kiss in Car : कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का?

शिरूरमध्ये बिबट्याची दहशत, जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल|VIDEO

SCROLL FOR NEXT