Tata Punch CAMO Saam Tv
बिझनेस

Tata Punch CAMO : टाटाची सर्वाधिक विक्री होणारी कार आता नवीन अवतारात! किंमत फक्त 8.45 लाख रुपये, कोणकोणते आहेत फिचर्स?

Tata Punch CAMO Special Edition Price Features : टाटा मोटर्सने टाटा पंचची स्‍पेशल ‘कॅमो’ एडिशन लाँच केलीय. या अलिशान कारमध्ये कोणकोणते फिचर्स आहेत, ते आपण जाणून घेवू या.

Rohini Gudaghe

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या एसयूव्‍ही उत्‍पादक कंपनीने आज भारतातील पहिल्‍या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार टाटा पंचची स्‍पेशल, लिमिटेड पीरियड कॅमो (CAMO) एडिशन लाँच केली. आता ही एडिशन आकर्षक नवीन सीवीड ग्रीन रंगासह पूरक सफेद रंगाचे रूफ, आर१६ चारकोल ग्रे अलॉई व्‍हील्‍स आणि अद्वितीय सीएएमओ थीम पॅटर्न असलेले प्रीमियम अपहोल्‍स्‍टरीसह उपलब्‍ध आहे. या एडिशनमध्‍ये फर्स्‍ट-इन-सेगमेंट वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे १०.२५-इंच इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टमसह वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्‍पल कारप्‍ले.

या एडिशनमध्‍ये कम्‍फर्ट-टेक वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे वायरलेस चार्जर, रिअर एसी वेंट्स व फास्‍ट सी-टाइप यूएसबी चार्जर आणि ग्रॅण्‍ड कन्‍सोलसह आर्मरेस्‍ट, जे टाटा पंचची साहसी क्षमता, प्रीमियम दर्जा आणि ड्रायव्हिंग अनुभवामध्‍ये अधिक भर (Tata Punch CAMO Special Edition Price) करतात. ८,४४,९०० लाख रूपयांच्‍या (एक्‍स-शोरूम नवी दिल्‍ली) आकर्षक सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असलेली पंच कॅमो आता टाटा मोटर्स वेबसाइटवर बुक करता येऊ शकते.

कॅमो एडिशन लाँच

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्‍स यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये लाँच झाल्‍यापासून पंचला आकर्षक डिझाइन, वैविध्‍यपूर्ण व सर्वसमावेशक कार्यक्षमता, (Tata Punch CAMO) एैसपैस जागा असलेले इंटीरिअर्स आणि अधिक सुरक्षिततेसाठी उत्तम कौतुकास्‍पद प्रतिसाद मिळाला आहे. या वेईकलने प्रमुख एसयूव्‍ही पैलूंचे यशस्‍वीरित्‍या लोकशाहीकरण करत नवीन श्रेणी स्‍थापित केली, तसेच कॉम्‍पॅक्‍ट फूटप्रिंटमध्‍ये सर्वसमावेशक पॅकेज देत आहे.

संपन्‍न मूल्‍य तत्त्व, स्‍टाइल आणि कार्यक्षमतेचे परिपूर्ण संयोजन आणि सतत वाढत असलेल्‍या लोकप्रियतेने टाटा पंचला आर्थिक वर्ष २५ मध्‍ये सर्व श्रेणींमधील सर्वाधिक विक्री होणारी वेईकल बनवले (Auto News) आहे. ही लोकप्रियता पाहता, आम्‍ही पंचचे आणखी एक लिमिटेड कॅमो एडिशन लाँच करत आहोत. सुरू असलेल्‍या सणासुदीच्‍या काळामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत ही एडिशन ग्राहकांना त्‍यांच्‍या आवडत्‍या एसयूव्‍हीचे मालक बनण्‍याचे आणखी एक कारण देईल.''

ग्राहकाच्‍या पसंतीची पूर्तता

टाटा पंच भारतातील सर्वात सुरक्षित सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हींमध्‍ये अग्रस्‍थानी आहे. या वेईकलला २०२१ जीएनसीएपी सुरक्षितता नियमांतर्गत प्रतिष्ठित ५-स्‍टार रेटिंग मिळाले आहे. प्रबळ डिझाइन, १८७ मिमी ग्राऊंड क्‍लीअरन्‍स, कमांडिंग ड्रायव्हिंग पोझीशन आणि भारतातील विविध प्रदेशांमधून सहजपणे प्रवास करण्‍याची क्षमता यासह पंच रोमांचक ड्रायव्हिंग अनुभव (Tata Punch CAMO Special Edition Features) देते.

या वेईकलने फक्‍त १० महिन्‍यांमध्‍ये १ लाख विक्रीचा टप्‍पा गाठत आणि फक्‍त ३४ महिन्‍यांमध्‍ये ४ लाख विक्रीचा टप्‍पा पार करत उद्योग बेंचमार्क्‍स स्‍थापित केले आहेत. पेट्रोल, ड्युअल-सिलिंडर सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा विविध पॉवरट्रेन्‍समध्‍ये व विविध परसोनामध्‍ये उपलब्‍ध असलेली पंच प्रत्‍येक ग्राहकाच्‍या पसंतीची पूर्तता करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Mega Auction Live: 'इंडियन' प्रीमियर लीग! 7 भारतीय खेळाडूंवर लागली 126 कोटींची बोली

Hill Stations:नोव्हेंबर महिन्यात हिल स्टेशनला जायचयं? तर 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या

Konkan Travel : कोकणचे वैभव असलेल्या 'या' राजवाड्याला कधी भेट दिलीय का?

Maharashtra News Live Updates: शनिवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट ‌

Sanjay Derkar News : 10 वर्षात मतदारसंघात काम झालं नाही; ठाकरेंचे नवनिर्वाचित आमदार देरकर यांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT