Tata Nexon CNG Google
बिझनेस

Tata Nexon CNG: टाटा नेक्सॉन मार्केट गाजवणार! स्पोर्टी लूक, एक्स्ट्रा बूट स्पेससह 'हे' हटके फीचर खास आकर्षण

Tata Nexon: टाटा मोटर्स ही वाहन उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कार लाँच करत असते. कंपनी आता लवकरच CNG नेक्सॉन कार लाँच करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tata Nexon CNG Price Features:

टाटा मोटर्स ही वाहन उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कार लाँच करत असते. कंपनीच्या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांनी खूप पसंती दर्शवली आहे. कंपनी आता लवकरच CNG नेक्सॉन कार लाँच करणार आहे.

टाटा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये टाटा नेक्सॉन सीएनजी सादर करणार आहे. याआधी कंपनीने या कारचे काही फोटो शेअर केले होते. (Latest News)

कंपनीचे सादर केलेले फोटो ही कॉनसेप्ट व्हर्जन आहे. तर प्रोडक्शन केलेले व्हर्जन लवकरच सादर केले जाणार आहे. त्यानंतर ती विक्रीसाठी लाँच केली जाणार आहे. ही नवीन टाटा नेक्सॉन सीएनजी सध्याच्या नेक्सॉन फेसलिफ्टवर आधारित असणार आहे. या कारमध्ये काही आवश्यक बदल करण्यात आले आहे. ही देशातील एकमेव कार असेल जी पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक आणि सीएनजी पर्यांयामध्ये बाजारात उपलब्ध होईल.

Tata Nexon CNG ही देशातील पहिली टर्बो-चार्ज केलेली एसयूव्ही असेल जी सीएनजीवर चालेल. सीएनजीचा पर्याय नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह दिला जातो. परंतु पहिल्यांदाच टाटाने 1.2 टर्बो चार्ज रेव्होट्रॉन इंजिनसह नेक्सॉन i-CNG संकल्पना सादर केली आहे.

टर्बो पेट्रोल इंजिन असलेली Nexon 5MT, 6MT, 6AMT आणि 7DCA च्या विविध ट्रान्समिशन पर्यायांसह येते. तथापि, त्याच्या CNG प्रकारात तुलनेने कमी ट्रान्समिशन पर्याय मिळतील.

कंपनी आपल्या नवीन Tata Nexon CNG कारमध्ये 30 लीटर ड्युअल सिलेंडर दिले आहे. यामध्ये दोन लहान सिलेंडर देण्यात आले आहे. यामुळे तुम्हाला बूट-स्पेसमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

Nexon i-CNG कार नवीन लूक आणि फीचर्ससह बाजारात लाँच होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये लीकेज प्रूफ मटेरियल, मायक्रो स्विच, सिंगल एडवांस ECU, थर्मल इंसीडेंट प्रोटेक्शन, फ्लूयमध्ये बदल करण्यासाठी ऑटो स्विच, लीक डिटेक्शन आणि मॉड्युलर फ्लूएल सारखे फिचर देण्यात आले आहे. ही एसयूव्ही डायरेक्ट सीएनजीवर स्टार्ट होणार आहे. या कारच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT