Tata Motors First Automatic CNG Car Launched soon in India Saam Tv
बिझनेस

Tata ची पहिली ऑटोमॅटिक CNG Car भारतात सादर, Maruti ला देणार टक्कर?

Tata Motors First Automatic CNG Car : आघाडीची कार उत्पादक कंपनी Tata Motors ने ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन तंत्रज्ञानासह भारतात आपली पहिली CNG कार सादर केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Tata Motors First Automatic CNG Car Launched soon In India:

आघाडीची कार उत्पादक कंपनी Tata Motors ने ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन तंत्रज्ञानासह भारतात आपली पहिली CNG कार सादर केली आहे. कंपनीने CNG सह Tiago आणि Tigor iCNG AMT मॉडेल सादर केले आहेत. यासाठी कंपनीने बुकिंग सुरू केली आहे.

तुम्ही या दोन वाहनांपैकी एक खरेदी करण्‍याचा विचार करत असल्‍यास, तर तुम्ही मोटर्सच्‍या अधिकृत डीलरशिपद्वारे किंवा 21,000 रुपयांच्‍या बुकिंग रकमेसह ऑनलाइन बुक करू शकता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकारांमध्ये मिळणार सीएनजीचा पर्याय

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन Tiago iCNG AMT तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यात XTA CNG, XZA+ CNG, आणि XZA NRG चा समावेश आहे. तर Tigor iCNG AMT दोन प्रकारांमध्ये ऑफर करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

या दोन्ही कार ट्विन-सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. यात ग्राहकांना अतिरिक्त बूट स्पेस देखील मिळेल. कार पेट्रोल आणि सीएनजी मोडमध्ये स्विच करण्यासाठी अॅडव्हान्स ECU सह सुसज्ज आहेत. ग्राहक ही सरळ सीएनजी मोडमध्येही सुरू करू शकतात. सिक्युरिटी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात एक मायक्रो स्विच देण्यात आला आहे. जो इंधन भरताना कार बंद करतो.

Maruti Swift

टाटाच्या या कारची मारुती स्विफ्टशी तुलना केल्यास, मारुतीमध्ये पेट्रोल आणि सीएनजी असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. मात्र सध्या कोणतीही कार सीएनजीमध्ये एएमटी तंत्रज्ञान देत नाही. जर तुम्ही फक्त AMT सह चांगली कार शोधत असाल तर मारुती स्विफ्ट हा देखील एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला 76.43 – 88.5 bhp ची पॉवर आणि 98.5Nm -113Nm चा पीक टॉर्क मिळतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

SCROLL FOR NEXT