Gold Bond Scheme  Saam Tv
बिझनेस

Svereign Gold Bond Scheme: खूशखबर! स्वस्तात सोनं खरेदीची संधी, सरकारी योजनेद्वारे मिळवा भरघोस नफा

Svereign Gold Bond Scheme 2024: आरबीआय आपल्याला स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी देत आहे. सार्वभौम गोल्ड बाँड योजनेतंर्गत आपल्याला ही संधी मिळत आहे. आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

Rohini Gudaghe

Svereign Gold Bond Scheme 2024 Date

भारबीआयने शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं. त्यात सार्वभौम गोल्ड बाँड योजना (Svereign Gold Bond Scheme) सोमवारपासून पाच दिवसांसाठी सुरू असणार असल्याचं सांगितलं आहे. गोल्ड बाँडच्या या हप्त्याची सबस्क्रिप्शन किंमत किती असेल, ते आपण जाणून घेऊ या. (Latest Marathi News)

सार्वभौम गोल्ड बाँड 2023-24 योजनेचा चौथा हप्ता या महिन्याच्या 12 ते 16 तारखेपर्यंत खुला असणार आहे. भारत सरकारने ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना दर्शनी मूल्यावर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँड्सची इश्यू किंमत 6,213 रुपये असेल, असं आरबीआयने म्हटलं आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कमी किमतीत सोने खरेदीची संधी

पुढील आठवड्यापासून म्हणजेच सोमवारपासून स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. आरबीआय सार्वभौम गोल्ड बाँड योजनेचा चौथा हप्ता 16 फेब्रुवारीपर्यंत खुला राहील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सुरू केलेली सार्वभौम सुवर्ण बाँड योजना सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. याची परिपक्वता 8 वर्षांत पूर्ण (Svereign Gold Bond Scheme 2024) होते.

या सोन्याची किंमत बाजारापेक्षा कमी आहे. यामध्ये ऑनलाइन गुंतवणूक केल्यास 50 रुपये प्रति ग्रॅमची सूटही दिली जाते. या योजनेत 2.50 टक्के अतिरिक्त व्याज दर दिला जातो. तो वर्षातून दोनदा खात्यात जमा केला जातो.

या योजनेत सोने कसे खरेदी करावे

या योजने​​तंर्गत सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करण्यासाठी, स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट बँक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (NSE) द्वारे खरेदी करता येते.

या लोकांना सोने विकत घेता येणार

आरबीआय भारत सरकारच्या वतीने गोल्ड बाँड योजना जारी करते. केवळ भारतीय रहिवासी, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF, ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था या सुवर्ण रोखे योजनेत गुंतवणूक करू शकतात. सोने रोखे योजना प्रथम नोव्हेंबर 2015 मध्ये सोन्याची मागणी कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

Pune : पुण्यात भयंकर घडलं, कंपनीतील ३ कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू

SCROLL FOR NEXT