Suzuki Jimny 5-Door:
प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी सुझुकीने आपल्या हाय एंड कार जिमनीचा नवीन 5 डोअर हेरिटेज एडिशन लॉन्च केला आहे. सध्या कंपनीने हा नवीन एडिशन फक्त ऑस्ट्रेलियात सादर केला आहे.
काही महिन्यांनंतर ही कार भारतातही लॉन्च होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत फक्त 500 युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. कंपनी सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या आपल्या 2023 च्या मॉडेलवर 1.50 लाख रुपयांपर्यंत आणि 2024 च्या मॉडेलवर 50 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे.
सुझुकी जिमनीचा नवीन 5 डोअर एडिशन रेड मड फ्लॅप्ससह उपलब्ध असेल. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. यात 5 डोअरसह ड्युअल कलरचा पर्याय दिला जाईल. कारमध्ये 9 इंच टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि टॉप व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील्स ग्राहकांना मिळणार.
नवीन जिमनीमध्ये ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि हिल होल्ड कंट्रोलचे फीचर्सही आहेत. ज्यामुळे खराब रस्त्यांवर कार कंट्रोल करणे सोपे होते. या मोठ्या आकाराच्या कारमध्ये वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सिस्टम आहे.
सुझुकी जिमनीमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे 4 सिलेंडर इंजिन हाय पॉवर देते. कारचे नवीन मॉडेल 100 एचपी पॉवर आणि 130 एनएम टॉर्क देईल, जे जुन्या मॉडेलपेक्षा कमी आहे. हे 4 आणि 5 स्पीड गिअरबॉक्ससह येते. या कारची प्रारंभिक किंमत 12.74 लाख रुपये एक्स-शोरूम आहे, कारचे टॉप मॉडेल 14.95 लाख रुपये एक्स-शोरूममध्ये ऑफर केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.