अक्षय बडवे
संगणक म्हणजे प्रत्येक माहितीचा साठा. सर्वच कार्यालयांपासून ते विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत संगणकामुळे सर्व कामे सहज सोप्पी झाली आहेत. अशात आता भारत संगणकाच्या विकासात आणखी प्रगती करणार असून महासंगणकांचा ‘महासंगणक साकारणार आहे.
सी-डॅकही भारतीय कंपनी साल २०२८ पर्यंत ‘परम शंख’ महासंगणक निर्माण करणार आहे. अमेरिका आणि जपाननंतर असा प्रयत्न करणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरणार आहे. एक्झास्केल क्षमतेचा हा महासंगणक २०२८-२९ पर्यंत अस्तित्वात येईल.
सी-डॅकच्या पुण्यातील प्रयोगशाळेत या संगणकाच्या निर्मितीचं काम होणर आहे. या महासंगणकासाठी देशभरातील संशोधन संस्था मदत करणार आहेत. संगणकासाठीचे सुटे भाग आणि मायक्रोप्रोसेसर देशातच विकसित करण्यावर शास्त्रज्ञांचा भर देत आहेत.
भारताने आजवर विविध क्षेत्रांत प्रगती केली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या पोहचणारा भारत हा पहिलाच देश आहे. इस्रोने १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरीकोटा येथून चांद्रयान- ३ लाँच केलं. २३ ऑगस्ट २०२३ रोजी हे चांद्रयान यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.