Sukanya Samriddhi Yojana Saam Tv
बिझनेस

Sukanya Samruddhi Yojana: मुलींसाठी सरकारची खास योजना! महिन्याला २९१६ रुपये गुंतवा अन् १६.१६ लाख मिळवा

Sukanya Samruddhi Yojana Calculation: केंद्र सरकारने मुलींसाठी खास सुकन्या समृद्धी योजना राबवली आहे. या योजनेत तुम्ही वर्षाला ३५००० रुपये गुंतवून १६.१६ लाख रुपये मिळवू शकतात.

Siddhi Hande

प्रत्येकाला आपल्या लेकीच्या भविष्याची चिंता असते. आपल्या लेकीला उत्तम शिक्षण मिळावे, तिचे लग्न उत्तम पद्धतीने व्हावे, यासाठी प्रत्येक आईवडिल फार पूर्वीपासूनच तिच्या भविष्यासाठी काही रक्कम बाजूला काढून ठेवत असतात. दरम्यान, मुलींसाठी तुम्ही खास योजना राबवली आहे. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना राबवली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला लाखो रुपये मिळतात.

सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला मुलगी लहान असल्यापासूनच गुंतवणूक करायची असते. तुमची मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तुम्हाला लाखो रुपये मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला १५ वर्षे गुंतवणूक करायची आहे.

सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला सध्या ८ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत चक्रव्याढ व्याजदरदेखील मिळते. या योजनेत मुलीचे खाते २१ वर्षापर्यंत असते. या योजनेत १५ वर्षांपर्यंत पैसे गुंतवणूक करु शकतात.या योजनेत मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम ही टॅक्स फ्री मिळते. या योजनेत तुम्ही महिन्याला २९१६ रुपये गुंतवून लाखो रुपये मिळवू शकतात.

वर्षाला ३५००० गुंतवा अन् १६.१६ लाख मिळवा

या योजनेत जर तुम्ही वर्षाला ३५००० रुपये गुंतवले तर १५ वर्षानंतर तुम्हाला लाखो रुपये मिळणार आहेत. या योजनेत तुम्ही ५ वर्षांसाठी ५.२५ लाख रुपये तुम्ही गुंतवतात.यावर तुम्हाला जवळपास १०.९१ लाख रुपये व्याज मिळणार आहे. जेव्हा तुमची मुलगी २१ वर्षांची होईल तेव्हा तुम्हाला १६.१६ लाख रुपये मिळणार आहे. यामधील फक्त ५.२५ लाख रुपये तुम्ही गुंतवलेली असेल. त्यावर मिळणारी सर्व रक्कम व्याजाची असेल.

सुकन्या समृद्धी योजना ही सरकारद्वारे चालवली जाते. या योजनेत तुम्हाला जास्त व्याजदर मिळते. या योजनेत गुंतवणूक आणि मॅच्युरिटी या दोन्ही गोष्टींवर मिळणार रक्कम टॅक्स फ्री असते. या योजनेत जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करायची असते. वर्षाला फक्त ३५००० रुपये म्हणजे महिन्याला फक्त २९१६ रुपये गुंतवायचे आहे. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळणार आहे. त्यावर चक्रव्याढ व्याजदेखील मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Time: नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra Live News Update: पुण्यात चायनिज मांज्यामुळे महिला जखमी

IIT हैदराबादच्या विद्यार्थ्याची कमाल! अवघ्या २१व्या वर्षी मिळालं २.५ कोटींचं पॅकेज; सर्व रेकॉर्ड मोडले

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT