online account opening for SSY with PNB One app  rawpixel/esakal
बिझनेस

Sukanya Samruddhi Yojana : आता बँकेत जायची गरज नाही, घरबसल्या उघडा सुकन्या समृद्धी योजनेचं खातं

Online Account Opening : आता बँकेत न जाता घरबसल्या सुकन्या समृद्धी योजनेचं खाते उघडणं शक्य. ऑनलाईन पद्धतीने खाते उघडा आणि मुलीच्या भविष्यासाठी बचत सुरू करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Know how to open Sukanya account online : आजकालच्या वाढत्या महागाईत आपल्या मुलांचे भविष्य कसे सुरक्षित करावे? अशी काळजी सर्वच पालकांना असते. त्यात मुलगी असेल तर तिचे शिक्षण, लग्न किंवा इतर गरजांसाठी पैसे साठवून ठेवणे आवश्यक असते. यासाठी भारत सरकारने २०१५ मध्ये सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणली होती. ही योजना 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या मोहिमेचा एक भाग आहे. मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

पालकांना सुकन्या समृद्धी योजनेसाठीचे खाते कोणत्याही अधिकृत बँकेत जाऊन उघडावे लागते. पण यासाठी दिवसभर बँकेत वेळ घालवण्याची गरज नाही. आता घरबसल्या देखील हे करणे शक्य झाले आहे. पंजाब नॅशनल बँकेने 'पीएनबी वन' (PNB One) हा एक अँड्रोईड अॅप आणला आहे. या अॅपवर फक्त काही स्टेप्स फॉलो करून योजनेसाठीचे खाते उघडता येते. पण त्यासाठी तुमच्याकडे पीएनबी बँकेचे सदस्यत्व असणे आवश्यक आहे.

सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही दरवर्षी किमान रू.२५० ते जास्तीत जास्त रू. १.५ इतकी गुंतवणूक करू शकता. हे खाते २१ वर्षांसाठी ते १८ वर्षांनंतर मुलीचे लग्न होईपर्यंत चालते. विशेष म्हणजे जमा केलेली रक्कम, त्यावर मिळणारा व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळालेल्या संपूर्ण रकमेवर कोणताही कर नाही. याला तिहेरी करमुक्त म्हणजेच EEE योजना म्हणतात, जी कलम ८०सी च्या अंतर्गत कर सूट देते. तसेच मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी पैसे काढता येतात.

पुढील स्टेप्स फॉलो करा आणि ऑनलाईन पद्धतीने पीएनबी वन अॅपद्वारे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडा :

१. तुमच्या फोनवर PNB One अॅप उघडा आणि लॉगिन करा.

२. मेनूमधून सेवा या पर्यायावर क्लिक करा.

३. त्यामध्ये सरकारी उपक्रम हा उपपर्याय निवडा.

४. नंतर सुकन्या समृद्धी खाते उघडण्याचा पर्याय निवडा

५. स्क्रीनवर दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Free chicken distribution in pune : ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या; जोडप्याने वाटलं 5000 किलो चिकन मोफत, VIDEO

Monday Horoscope : वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा उंचावेल, विष्णू उपासना फायदेशीर ठरणार; 'या' राशींच्या लोकांना प्रेमात लाभ होणार

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंचा युतीबाबत नवा दावा?

Marathi Language Controversy: मुंबईत पुन्हा मराठी-हिंदी वाद उफाळला; परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार, VIDEO

Couple Romance Viral video : आता याला काय म्हणावं? गर्लफ्रेंडने डोके मांडीवर ठेवले अन्...; उडत्या विमानात कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT