Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: अकोल्यात रंगीबेरंगी फुलकोबी फुलवली; 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग; महिन्याला कमावतो लाखो रुपये

Success Story Of Akola Farmer: अकोल्याच्या २६ वर्षीय शेतकऱ्याने रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड केली आहे. या फुलकोबीतून तो महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

शेतकरी हा नेहमीच आपल्या शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करत असतात. अनेकदा शेतीत वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असतात. अकोल्यात पहिल्यांदाच रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड करण्यात आली आहे. बीएससीचं शिक्षण घेतलेल्या 26 वर्षीय तरुणाने हा प्रयोग केलाय. पिवळ्या, पांढऱ्या, हिरव्या, गुलाबी, केशरी अशा अनेक 8 प्रकारच्या रंगाच्या कोबीची लागवड करण्यात आली. (Success Story)

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या माळेगाव येथील अंकित उत्तम म्हसाळ असे या कोबी उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या या प्रयोगमुळं लोकांसह शेतकऱ्यांना आश्चर्य वाटतोय. खूप कमी वयात त्याने शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करण्याचे धाडस केले आणि त्यात ते यशस्वी झाले. (Success Story Of Akola Farmer)

दरम्यान,अंकितने 3 एकरात विविध रंगाची कोबीची लागवड केलीये अंकितला एकरमागे 1 लाख रुपयांपर्यंत लागवड खर्च लागला आहे. त्यातून अंकित एकरमागे 3 लाख रुपये उत्पन्न घेतोय. अवघे तीन महिन्यात अंकितने 3 एकरातून नऊ लाखाचे उत्पन्न घेतले.. विशेष म्हणजे या रंगीबेरंगी कोबीचे सेवन करण्याचे अनेक फायदे असल्याचंही अंकितने सांगितले आहे.

पांढरी फुलकोबी, केशरी फुलकोबी, जांभळी फुलकोबी, ब्रोकोली, हिरवी फूलगोभी, लाल पत्ताकोबी, हिरवी पत्ताकोबी आणि लेटूसचा यात समावेश आहे. ब्रोकलीला 100 ते 150 किलोप्रमाणे बाजारात भाव मिळतो आहेय. तर केशरी आणि गुलाबी फुलकोबी याशिवाय गुलाबी पत्तागोबीला 100 ते 120 किलोप्रमाणे भाव मिळतोय. विशेष म्हणजे हा भाव शेतकरी ते ग्राहक विक्रीतून मिळत असल्याचे अंकित वडील सांगत आहेत. ते अंकितला कोबी तोडण्यापासून बाजारात विक्रीसाठी हातभार लावत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT