Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: दिवसा स्विगी डिलिव्हरी बॉय, रॅपिडो ड्रायव्हर अन् रात्री अभ्यास; दुसऱ्या प्रयत्नात क्रॅक केली JPSC; सूरज यादवचा प्रवास

Success Story Of Swiggy Delivery Boy Crack JPSC: झारखंडच्या सूरज यादवने दुसऱ्या प्रयत्नात जेपीएससी परीक्षा पास केली. त्याने दिवसा डिलिव्हरी बॉयचे काम केले आणि रात्री अभ्यास केला.

Siddhi Hande

  • झारखंडच्या सूरज यादवने क्रॅक केली JPSC

  • दिवसा डिलिव्हरी बॉयचे काम अन् रात्री अभ्यास करायचा

  • मेहनतीने आणि जिद्दीने क्रॅक केली स्पर्धा परीक्षा

स्पर्धा परीक्षा देऊन अनेकांना प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा असते. नुकतीच झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अनेक तरुणांनी यश मिळवले. या परीक्षेत झारखंडच्या गिरिडीहच्या सुरज यादवनेदेखील यश मिळवले आहे. सूरज हा स्विगीसाठी डिलिव्हरी बॉयचे काम करायचा. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्याने हार मानली नाही. शेवटी झारखंड लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली.

डिलिव्हरी बॉय म्हणून करायचा काम

सूरज यादव यांचे बालपण खूप खडतर गेले. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. वडील मजूरी करायचे. या खर्चातून त्यांचा घरखर्चदेखील निघत नव्हता. परंतु तरीही त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी सरकारी अधिकारी होण्याचे ठरवले आणि त्यासाठी अभ्यासदेखील सुरु केला.

सूरजने स्विगीसाठी डिलिव्हरी बॉयचे काम केले. याचसोबत रॅपिडोसाठीही काम केले. त्यांनी खूप मेहनत घेतली. रॅपिडो चालवून ते आपल्या शिक्षणाचा खर्च करायचे. सुरुवातीला त्याच्याकडे बाईक नव्हती. तेव्हा मित्रांनी स्कॉलरशिपच्या पैशातून त्याची मदत केली. त्यामुळेच त्याने सेकंड हँड बाईक खरेदी केली.

कामासोबत अभ्यास

सूरज रोज ५ तास काम करायचा आणि इतर वेळी अभ्यास करायचा. त्यांच्या कुटुंबानेही त्याची साथ दिली. सूरजने जेपीएससी (JPSC) परीक्षा दिली आणि पासदेखील केली. त्याने परीक्षेत ११० रँक मिळवली. इंटरव्ह्यूसाठी गेल्यावर त्यांनी सांगितले की, मी डिलिव्हरी बॉयचे काम करायचो. हे ऐकून बोर्डाचे सदस्यदेखील चकित झाले. परंतु सूरजच्या आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली.

सूरज हे खूप मेहनती आहेत. त्यांनी पैसे कमवण्यासाठी दिवसभर का केले आणि रात्री अभ्यास केला. रोज ते अभ्यासासाठी वेळ काढायचे. त्यांनी पहिल्या प्रयत्नात अपयश आले परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात ११० रँक प्राप्त केली. त्यांचा हा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravivar che Upay: रविवारच्या दिवशी जरूर करावेत 'हे' उपाय; सूर्य देव प्रसन्न होऊन देतील आशिर्वाद

Maharashtra Live News Update : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर 'नाईट रायडर' बारवर मनसेची मध्यरात्री धडक

Umbrella Fall : भंडारदऱ्याच्या कुशीत लपलेला अंब्रेला फॉल्स, मोजक्या लोकांना माहितीये

Meghana Bordikar Video : ग्रामसेवकाला धमकी का दिली? मेघना बोर्डीकरांचे स्पष्टीकरण, मंत्री काय म्हणाल्या...

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेच्या मोलकरणीच्या मुली बेपत्ता; FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT