Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: इस्त्रोसह १६ सरकारी नोकर्‍या धुडकावल्या, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक;IPS तृप्ती भट्ट यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IPS Trupti Bhatt: तृप्ती भट्ट यांनी १६ सरकारी नोकरी धुडकवल्या आणि यूपीएससी परिक्षेची तयारी केली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

Siddhi Hande

अनेकांचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न असते. सरकारी अधिकारी होण्यासाठी यूपीएससी परीक्षा अनेकजण देतात. परंतु अनेकांना पहिल्या प्रयत्नात यश मिळत नाही. परंतु कितीही काहीही असलं तरीही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण मेहनत करतात. असंच काहीसं तृप्ती भट्ट यांनी केलं. त्यांनी जवळपास १६ सरकारी नोकरी धुडकावल्या अन् यूपीएससी परिक्षेची तयारी केली. (Success Story Of IPS Trupti Bhatt)

तृप्ती भट्ट या मूळच्या उत्तराखंडच्या रहिवासी. त्यांच्यात कुटुंबातील अनेकजण शिक्षक होते. त्यांनी बीरशेबा सेकंडरी स्कूमधून १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंकर पंतनगर विश्वविद्यालयमधून त्यांनी इंजिनियरिंग केले. यानंतर त्यांनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी सुरु केली. (UPSC Success Story)

तृप्ती यांनी जवळपास १६ सरकारी नोकरी धुडकावल्या. यात त्यांनी इस्त्रोकडूनही नोकरीची ऑफर देण्यात आली होती. परंतु त्यांनी ती स्विकारली नाही. त्यांनी यूपीएससी देऊन सरकारी अधिकारी होण्याचे ठरवले.

तृप्ती या जेव्हा ९वीत होत्या. तेव्हा त्यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांना हाताने लिहलेले एक पत्र भेट म्हणून देण्यात आले. या पत्रात त्यांचे देशाच्या प्रती असलेले कर्तव्य आणि प्रेमाबद्दल लिहले होते. यातून त्यांना प्रेरणा मिळाली.

२०१३ मध्ये तृप्ती यांनी पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली.तेव्हा पहिल्याच प्रयत्नात १६५ रँक मिळवली. त्या सध्या IPS अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांनी आयुष्यात खूप मेहनत करुन हे यश मिळवले आहे. चांगल्या पगाराची नोकरी मिळत असतानाही त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT