Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आईला वर्दीत पाहून मिळाली प्रेरणा; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS झालेल्या पूजा गुप्ता आहेत तरी कोण?

IAS Pooja Gupta Success Story: पूजा गुप्ता यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांच्या आई इन्स्पेक्टर आहे. आईला वर्दीत पाहून त्यांना यूपीएससी परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली.

Siddhi Hande

पूजा गुप्ता यांनी दोनदा केली यूपीएससी क्रॅक

पहिल्या प्रयत्नात IPS अन् दुसऱ्या प्रयत्नात IAS अधिकारी

आईला वर्दीत पाहून मिळाली प्रेरणा

मेहनत, जिद्द आणि इच्छाशक्ती या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही काहीही करु शकतात. यश हे तुम्हाला मिळणारच. असंच काहीसं दिल्लीच्या पुजा गुप्ता यांच्यासोबत झालं. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा पास केली. एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. २०१८ मध्ये पुजा यांनी यूपीएससी परीक्षा पास केली त्या आयपीएस अधिकारी झाली. मात्र, त्यांच्या आजोबांचे पूजा या आयएएस ऑफिसर व्हाव्यात असं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि आयपीएसनंतर त्या आयएएस झाल्या.

पूजा यांनी दुसऱ्यांदा नोकरीसोबतच यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. २०१८ नंतर लगेच २०२० मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत ४२ रँक प्राप्त केली. त्या आज आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

मेडिकलची तयारी

पूजा या मूळच्या दिल्लीच्या आहेत. त्यांचे वडील प्रायव्हेट कंपनीत काम करत होते. त्यांची आई इन्स्पेक्टर आहेत. त्यांनी १२वीनंतर मेडिकलची तयारी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अभ्यास करताना त्यांच्या मनात नेहमी देशसेवा करण्याचा विचार यायचा. आईला वर्दीत पाहून त्यांनाही सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याची प्रेरणा मिळाली.

पूजा यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी सुरु केली. मेहनत आणि वेळेचं गणित साधत त्यांनी स्ट्रॅटेजी तयार केली. या माध्यमातून त्यांनी देशातील सर्वात अवघड परीक्षा यूपीएससी परीक्षा पास केली.त्यांनी २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी २०२० मध्ये पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा पास केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

Bihar Bhavan: मुंबईत उभारणार बिहार भवन; ३० मजली इमारत बांधणार, खर्च ३१४ कोटी; मनसेचा विरोध | VIDEO

Uddhav Thackeray : ऐन झेडपी निवडणुकीत शिंदेंचा ठाकरेंना झटका; बड्या नेत्यासह ३०० जणांनी सोडली साथ

Vitamin B Deficiency: सतत थकवा, चक्कर येतेय? Vitamin Bची असू शकते कमी, वेळीच ओळखा संपूर्ण लक्षणं

Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये जेवणात काय काय मिळणार? वाचा मेन्यू

SCROLL FOR NEXT