Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story : काही वर्षांपूर्वी कुणी ओळखतही नव्हतं, कोरोनाने बदललं आयुष्य; आज उभारली मुकेश अंबानींपेक्षा दहापट मोठी कंपनी

Success Story Of Nvidia Founder: काही वर्षांपूर्वी Nvidia कंपनीचे नावदेखील कोणाला माहित नव्हते. परंतु या कंपनीने आयटी क्षेत्रात खूप प्रगती केली आहे.

Siddhi Hande

मेहनत आणि कामात सातत्य ठेवल्यास तुम्ही आयुष्यात खूप यशस्वी होतात. कधीकधी आपली ओळख जगाला पटायला वेळ लागतो, परंतु काही काळानंतर आपण आयुष्यात एवढे यशस्वी होतो की संपूर्ण जग आपल्याला ओळखते. असंच काहीसं अमेरिकन एआय चिप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी एनव्हिडिआसोबत झालं. एनव्हिडिआ कंपनी ही जगातील सर्वात महागडी कंपनी आहे. या कंपनीने अॅपललादेखील मागे टाकले आहे.

एनव्हिडिया कंपनीचे मार्केट कॅप ३.६४८ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहचले आहे. हे मार्केट कॅप अनेक देशांच्या GDP पेक्षा जास्त आहे. कंपनीचे मार्केट कॅप रिलायन्स इंडस्ट्रीजच्या १८ पट आहे.

Nvidia या कंपनीचे मार्केट कॅप मागच्या १२ महिन्यात २.४ ट्रिलियनने वाढले आहे. या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ जेन्सेन हुआंग हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव ११ व्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती १२७ अब्ज डॉलर आहे.

हुआंग यांचा जन्म १९६३ मध्ये तैवानमध्ये झाला होता. त्यांचे बालपण थायलंडमध्ये गेले. त्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी त्यांना अमेरिकेत नातेवाईकांकडे पाठवले. त्यानंतर त्यांनी १९९३ मध्ये Nvidia कंपनीची सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला व्हिडिओ गेम ग्राफिक्स चिप्स तयार केला.जेव्हा कंपनीचे शेअर्स १०० डॉलरवर पोहचले तेव्हा त्यांनी कंपनीच्या नावाचा लोगो हातावर काढला.

या कंपनीसाठी कोरोना काळ वरदान ठरला, असं म्हणायला हरकत नाही. याच काळात एनव्हिडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. क्रिप्टो बुममुळे चिप्सचा वापर वाढला होता. त्यानंतर कंपनीची वॅल्यू काही दिवसांनी घसरली. परंतु एआयचा (AI) ट्रेंड आल्याने हे चित्र बदलले. त्यांनी एआय चिप्स बनवण्यास सुरुवात केली. जगभरातील अनेक कंपन्या ChatGPT सारखे AI वापरु शकतात.

Nvidia कंपनीची स्पर्धा मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या मोठ्या कंपन्यांशी आहे. Nvidia चिप्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. चॅटबॉट्ल आणि इतर टूल्सच्या ट्रेंडमुळे आगामी काळात कंपनीची वॅल्यू अधिक वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कंपनीच्या नफ्यात ६२८ टक्के तर महसुलात २६८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT