Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: भावांचा नाद खुळा! मातीशिवाय घरातच उगवले 'केशर'अन् सुरू केला व्यवसाय; आज कमावतात लाखो रुपये

Success Story Of Two Brothers: हरियाणातील दोन भावांनी खूप मेहनत घेऊन घरातच केशर वाढवले आहे. या केशरमधून ते लाखो रुपये कमावतात.

Siddhi Hande

अनेक तरुणांचे स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न असते. स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कामात सातत्य आणि मेहनत खूप आवश्यक आहे. मेहनत केल्यावर आपल्याला यश हे मिळतेच. बिझनेस करण्यासाठी सर्वात महत्त्वाची ही आयडिया असते. जर तुमची आयडिया नागरिकांसाठी आवश्यक असेल तर तुमचा व्यवसाय नक्कीच यशस्वी होईल. असंच यश हरियाणातील नवीन आणि प्रवीन सिंधू यांना मिळालं आहे.

हरियाणातील या दोन भावांनी घरामध्ये केशर पिकवण्याचा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वीदेखील झाला. त्यामुळे त्यांचा व्यवसाय आता खूप मोठा झाला आहे. त्यांनी इराण आणि इस्त्रायलचे प्रगत एरोपेनिक तंत्रज्ञान वापरुन केशर पिकले आहे. यामध्ये झाडे ही मातीशिवाय हवेत वाढतात. (Success Story)

या तंत्रज्ञानामुळे त्यांनी घराच्या गच्चीवर काश्मिरी केशर पिकवून लाखो रुपये कमावले आहे. केशर हा देशातील सर्वात महाग मसाला आहे. त्यामुळे केशर पिकवून या दोन भावांनी नवीन आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

२०१८ मध्ये या दोन भावांनी घराच्या टेरेसावरील १५ बाय १५ फूट खोलीचे रुपांतर प्रयोगशाळेत केले. येथे त्यांनी एरोपेनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करुन केशर वाढवण्यास सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला या सेटअपमध्ये ६ लाखांची गुंतवणूक केली.

प्रवीण सिंधूने एमटेकचे शिक्षण घेतले आहे. तेव्हाच त्याला ही कल्पना सुचली. त्यावेळी ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या भावाला ही आयडिया सांगितली. त्यानंतर दोन्ही भावांनी मिळून हा व्यवसाय सुरु केली. या दोघांनीही थायलंडला जाऊन कार्डीसेप्स मशरुम वाढवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर जम्मू काश्मिरमधून केशर लागवडीचे शिक्षण घेतले. भारतातील ९० टक्के केशर हे जम्मू काश्मिरमध्ये पिकते. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन शिक्षण घेतले. (Success Story Of Two Brother grows Keshar At Home)

सुरुवातीला या दोन्ही भावांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी काश्मिकरमधून १०० किलो केशरचे बल्ब मागवले होते. मात्र, पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये पुन्हा १०० किलो बल्ब खरेदी केले. ते वाढवण्यात या दोघांना यश आले. त्यामुळे त्यांची प्रगती होत गेली. त्यांना सर्वप्रथम ५०० ग्रॅम केशर मिळाले, ते त्यांनी अडीच लाखांना विकले. यानंतर त्यांनी २ किलो केशर तयार केले. जे त्यांनी १० लाख रुपयांना विकले.

आता हे दोन्ही भाऊ अमर्त्वा या ब्रँडखाली केशर विकतात आणि निर्यात करतात. या नवीन प्रयोगातून ते आता लाखो रुपये कमवत आहेत. (Keshar Owner Success Story)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT