Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडील मजुरी करायचे, आई भाजी विकायची, सोलापूरचा लेक IPS झाला, २० लाखांची नोकरी सोडून UPSC केली क्रॅक

Success Story of IPS Sharan Kamble: सोलापूरचे शरण कांबळे यांनी एकदा दोनदा नव्हे तर तीनदा यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांचे बालपण खूप खडतर परिस्थितीतून गेले होते. त्यांनी खूप मेहनतीने हे यश मिळवले आहे.

Siddhi Hande

सोलापूरच्या लेकाची कमाल

शरण कांबळे यांनी सलग तीनदा क्रॅक केली UPSC

२० लाखांच्या पगाराची नोकरी सोडली

उच्च पदावर काम करण्याची इच्छा अनेकांना असते. चांगल्या पदावर काम करण्यासाठी खूप अभ्यास आणि मेहनत करावी लागते.हा प्रवास अनेकदा खडतर असतो. परंतु कितीही खडतर असला तरीही तो पूर्ण करायचा असतो. असंच काहीसं शरण कांबळे यांनी केलं. त्यांनी एकदा दोनदा नव्हे तर सलग तीन वेळा यूपीएससी परीक्षा पास केली.

सोलापूरचा लेक झाला IPS

शरण कांबळे हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील ताडवाले या गावचे रहिवासी. त्यांचा जन्म गरब कुटुंबात झाला. त्यांच्या आईवडिलांनी खूप खडतर परिस्थितीतून मुलांना शिकवले. त्यांचे वडील मजुरी करायचे. आई भाज्या विकायची. आर्थिक परिस्थितीती बेताची असतानाही त्यांनी मुलांच्या अभ्यासात कोणतीच कसर सोडली नाही

शरण यांचे सुरुवाती शिक्षण गावातील सरकारी शाळेत झाली. १०वीचे शिक्षण झाल्यानंतर त्यांना खूप मेहनत करावी लागली. रोज गावापासून १२ किलोमीटर दूर चालत जायचे. त्यांच्या गावात वीजदेखील नसायची.अशा परिस्थितीत त्यांनी अभ्यास केला.

शरण यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केले. यानंतर प्रतिष्ठित संस्था IISc मधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांनी महाराष्ट्र स्कॉलरशिपदेखील मिळवली होती. त्यांना या पैशांमुळे खूप मदत झाली.

तीन वेळा UPSC क्रॅक

इंजिनियरिंग झाल्यानंतर शरण कांबळे यांना एका कंपनीत २० लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली. परंतु त्यांना सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचे होते. त्यांनी यासाठी २० लाख पगाराची नोकरी सोडली. त्यांनी सलग तीन वेळा यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी आयपीएस होण्याचा ऑप्शन निवडला. त्यांच्या या यशामुळे सर्वांनाच प्रेरणा मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत ईडीची मोठी कारवाई, कुटेंना ठोकल्या बेड्या, घोटाळ्याचं नेमकं प्रकरण काय?

Madgaon Tourism: माथेरान-महाबळेश्वर नक्कीच विसराल, मडगांवपासून ३ तास दूर आहे हे हिल स्टेशन

Money Scam : टोरेसनंतर दादरमध्ये आणखी एक घोटाळा, १५० जणांना कोट्यवधींना गंडवले, वाचा नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : जळगाव उन्हाचा तडाखा वाढला, शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश

Badlapur: बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, सोनोग्राफी सेंटर पोलिसांकडून सील

SCROLL FOR NEXT