Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: इंटरव्ह्यूआधी वडिलांचे निधन, आभाळाएवढं दुःख तरी मानली नाही हार; शुभम राय यांनी ६व्या प्रयत्नात क्रॅक केली MPPSC

Success Story of Shubham Rai Crack MPPSC: शुभम राय यांनी मोठ्या जिद्दीने एमपीपीएससी परीक्षा पास केली आहे. ते तीन वेळा इंटरव्ह्यू राउंडपर्यंत पोहचून अपयशी झाले. परंतु त्यांनी हार मानली नाही.

Siddhi Hande

शुभम राय यांचा प्रेरणादायी प्रवास

सहाव्या प्रयत्नात केली MPPSC

इंटरव्ह्यूआधीच झाले वडिलांचे निधन

मोठ्या हिम्मतीने झाले प्रशासकीय अधिकारी

लोकसेवा आयोगाची परीक्षा ही सर्वात जास्त अवघड असते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तुमची हिम्मत, धैर्य, मेहनत आणि सातत्याने तुम्ही कोणतीही परीक्षा पास करु शकतात. असंच काहीसं शुभम राय यांनी केलं. त्यांनी ६ व्या प्रयत्नात एमपीपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली असून त्यांची अधिकारी पदावर निवड झाली आहे.

शुभम राय यांचे शिक्षण (Shubham Rai Crack MPPSC)

शुभम राय हे सिवनी जिल्ह्यातील सागर गावचे रहिवासी.त्यांनी आपले शालेय शिक्षण सरस्वती शिशु मंदिरमधून पूर्ण केले. त्यानंतर कॉलेजमध्ये त्यांनी बीएससी पदवी प्राप्त केली. त्यांचे प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न होते.

शुभम यांनी २०१७ मध्ये त्यांच्या एमपीएससी परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली होती. परीक्षेच्या तयारीसाठी ते इंदौरला गेले होते. त्यांनी सुरुवातीला अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर स्टडी मटेरियल आणि सेल्फ नोट्सद्वारे त्यांनी अभ्यास केला.

शुभम यांनी ६व्या प्रयत्नात परीक्षा पास केली. यातील ३ वेळा ते इंटरव्ह्यूपर्यंत पोहचले. पहिल्यांदा अपयशी झाल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी खूप मेहनतीने यश मिळवले.

इंटरव्ह्यूआधी ३ महिने शुभम यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या जाण्याने त्यांना खूप धक्का बसला होता. परंतु तरीही त्यांनी हिम्मतीने प्रयत्न सुरु ठेवली. याचाच परिणाम त्यांना यश मिळाले. शुभम सध्या सहकारी विस्तार अधिकारी/ सहकारी निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT