Poonam Gupta Saam Tv
बिझनेस

Success Story: MBA करुन बेरोजगार, रद्दीच्या पेपरचा ढीग पाहून सुचली 'आयडिया'; पूनम गुप्ता आज ८०० कोटींच्या मालकीण

Success Story of PG Paper Owner Poonam Gupta: स्वतः चा व्यवसाय करावा अशी अनेकांची इच्छा असते. परंतु बिझनेस करताना अनेकदा अपयश येते. परंतु या अपयशावर मात करुन पूनम गुप्ता यांनी स्वतः चा व्यवसाय सुरु केला आहे.

Siddhi Hande

प्रत्येकाची काही न काही स्वप्न असतात. परंतु अनेकदा स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी येतात. आपले स्वप्न पूर्ण होईल की नाही अशी शंका निर्माण होते. परंतु या सर्व अपयशांवर आणि अडचणींवर मात करुन जी व्यक्ती यशस्वी होतो. असंच यश उद्योगपती पूनम गुप्ता यांना मिळालं आहे. पूनम गुप्ता यांनी ८०० कोटींची कंपनी उभारली आहे.

पूनम गुप्ता यांनी रद्दी पेपरमधून स्वतः चा बिझनेस उभारला आहे. पूनम गुप्ता या मूळच्या दिल्लीच्या रहिवासी आहेत. त्यांनी लेडी श्रीराम कॉलेजमधून इकोनॉमिक मध्ये ऑनर्स केले आहे. त्यानंतर त्यांनी एमबीए केले.

एमबीए केल्यानंतर त्यांनी नोकरी शोधायला प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश मिळाले. त्यांना नोकरी करण्यात यश मिळाले नाही. २००२ साली पूनम गुप्ता यांचे लग्न पुनीत गुप्ता यांच्याशी झाले. ते स्कॉटलँड येथे नोकरी करतात. त्यामुळे पूनमदेखील स्कॉटलँडमध्ये शिफ्ट झाल्या. त्यांच्याकडे अनुभव नसल्याने स्कॉटलँडमध्येदेखील नोकरी शोधण्यासाठी त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यावेळी त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली.

पूनम गुप्ता यांच्या डोक्यात रद्दी पेपरबाबत एक आयडिया आली. त्या नोकरीच्या शोधात असताना त्यांनी अनेक ऑफिसला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ऑफिसमध्ये रद्दीचे मोठे गठ्ठे दिसले. त्यानंतर त्यांनी रिसर्च सुरु केला. त्यावेळी रद्दीपासून रिसायक्लिंग करुन नवीन काहीतरी बनवण्याची आयडिया त्यांच्या डोक्यात आली. याचदरम्यान त्यांना स्कॉटलँडच्या एका योजनेतून १,००,००० रुपयांचा फंडदेखील मिळाला. यानंतर त्यांनी नोकरी करण्यापेक्षा स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला.

२००३ मध्ये पूनम गुप्ता यांनी PG Paper या नावाने रद्दी रिसायकलिंग करणारे स्टार्टअप सुरु केले. त्यांनी रद्दी पेपर खरेदी करुन ते रिसायकल करुन अधिक चांगल्या क्वालिटीचे पेपर बनवायला सुरुवात केली. या व्यवसायात त्यांना खूप यश मिळाले. आज त्यांनी ८०० कोटींची कंपनी उभारली आहे. (Business Owner Poonam Gupta Success Story)

जगभरात व्यवसायाची चर्चा (Success Story Of Pg Paper Owner)

सुरुवातीला पीजी पेपर नावाचा बिझनेस हा स्थानिक लेवलवर होता. त्यानंतर त्याची डिमांड वाढल्याने स्कॉटलँडमध्ये व्यवसायाचा विस्तार झाला. त्यानंतर त्यांनी यूरो, अमेरिकेतदेखील आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. जगभरात ६० देशांमध्ये पीजी पेपर कंपनीचा विस्तार झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भारताला तर पाकिस्तानही हरवेल...' टीम इंडियावर Wasim Akram ची जहरी टीका

Chandra Gochar 2024: 'या' ३ राशींचा गोल्डन टाईम संपला; चंद्राच्या गोचरमुळे अडचणीत होणार वाढ

Homemade Snacks Quick Recipe: पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आलाय? मग नाश्त्याला 'या' युनिक रेसिपी नक्की ट्राय करा

UP Madrasa Act : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; UP मदरसा अ‍ॅक्टला मान्यता, 17 लाख विद्यार्थ्यांना दिलासा

HBD Virat Kohli: महागड्या गाड्या, अलिशान घर; दिवसाला कमावतो 5 कोटी! विराटची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT