Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ४ वर्षे मोबाईल वापरला नाही, २२ व्या वर्षी UPSC क्रॅक अन् IAS झाल्या, महाराष्ट्र कन्या स्नेहल यांची यशोगाथा वाचा

Success Story Of IAS Snehal Dhayagude: यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. महाराष्ट्रातील स्नेहल धायगुडे यांनी वयाच्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

Siddhi Hande

प्रचंड मेहनत केल्यानंतर तुम्हाला यश हे मिळतेच. शिक्षण, प्रचंड अभ्यास आणि सातत्य या गोष्टी केल्याने तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. असंच यश महाराष्ट्राच्या स्नेहल धायगुडे यांनी मिळवलं आहे. स्नेहल धायगुडे यांनी २२व्या वर्षा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आणि अन् आयएएल झाल्या.

स्नेहल धायगुडे या मूळच्या खंडाळा तालुक्यातील बोरी गावच्या रहिवासी. त्या राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. स्नेहल यांचे वडील हेड कॉन्स्टेबल म्हणून काम कर होते. (IAS Snehal Dhayagude Success Story)

लहान कुटुंबात जन्मलेल्या स्नेहल यानी साखरवाडी येथून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी बीएएसी एग्रोमध्ये पदवी मिळवली. यानंतर त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली. कॉलेजमध्ये असतानाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांनी २०१७ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. परंतु त्यांना अपयश आले. त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी २०१८ मध्ये १०८ रँक मिळाली. वयाच्या २२ व्या वर्षीच त्या आयएएस झाल्या.

स्नेहल यांचे वडील सातारा पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करत होत्या. त्यांच्या आई गृहिणी होत्या. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी जिद्दीने यूपीएससी परीक्षा क्लिअर केली. (IAS Success Story)

स्नेहल यांचा एक व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्नेहल सांगत आहेत की, कॉलेजमध्ये असताना ४ वर्ष मी मोबाईल वापरलाच नाही. मला कॉलेजमध्ये आईवडिलांशी बोलायची गरज भासली तर मैत्रिणींच्या फोनवरुन फोन करायची. त्याचसोबत इंटरनेट उपलब्ध असायचं त्यामुळे त्याचा वापर मी करायची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT