पिझ्झा हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. भारतात तर पिझ्झा विकणाऱ्या कंपनीचे मोठे मार्केट आहे. भारतात डॉमिनोज, पिझ्झा हट या कंपन्या पिझ्झा विकतात. परंतु एवढ्या लोकप्रिय कंपनीच्या शर्यतीत उतरण्याचा निर्णय सनम कपूर यांनी घेतला. सनम कपूर यांनी ला पिनोझ (La Pinoz) या ब्रँडची सुरुवात केली.
La Pinoz ही देशातील तिसरी सर्वात मोठी पिझ्झा विकणारी कंपनी आहे. कंपनीचा टर्न ओवर तब्बल १००० कोटी रुपये आहे. या कंपनीची सुरुवात सनम कपूर यांनी केली. सनम कपूर हे आयटी कंपनीत कामाला होते. त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसय करण्याचा निर्णय घेतला. (LA Pinoz Pizza Owner Success Story)
सनम कपूर हे मोठ्या आयटी कंपनीत कामाला होते. त्यांना नेहमीच व्यवसाय सुरु करायचा होता. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतः चा ब्रँड सुरु केली. आज त्यांचे देशभरात ६०० पेक्षा जास्त फ्रँचायझी आहेत.
सनम कपूर यांनी २०११ मध्ये १२० स्क्वेअर फूटमझ्ये स्वतः चे दुकान उघडले. याचे नावे पिनोचियो पिझ्झा असे होते. तेव्हा संपूर्ण देशात डॉमिनोज, पिझ्झा हट या कंपन्या प्रसिद्ध होत्या. तेव्हा त्यांनी स्वतः गुंतवणूक करुन व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला.
सनम कपूर यांनी पूर्ण पिझ्झा विकण्याऐवजी त्याचे स्लाइस विकण्यास सुरुवात केली.त्यामुळेच ही कंपनी इतर कंपनीच्या तुलनेत वेगळी ठरली आहे.यामुळे या कंपनीचे नाव बदलून ला पिनोज पिझ्झा असे ठेवण्यात आले. याचा अर्थ असा की, इटालियनमधील मोठा पिझ्झा. (Sanam Kapoor Success Story)
ला पिनोझ कंपनीचा पिझ्झा हा तुलनेत स्वस्त होता. तसेच त्याची चवदेखील खूप चांगली होती.त्यांनी पिझ्झाला भारतीय टच देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पनीर मखानी पिझ्झा,पनीर बटर मसाला पिझ्झा, मखानी दो प्याझा पिझ्झा यांचा समावेश केला. त्यामुळे हा पिझ्झा कमी कालावधीत खूप प्रसिद्ध झाला. या कंपनीने आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यानंतर कंपनीने जैन पिझ्झादेखील देण्यास सुरुवात केली. यानंतर कंपनीने आपल्या वेगवेगळ्या शहरात शाखा उघडल्या.
याज कंपनीच्या ६०० फ्रँचायझी आहेत. कंपनीची नेट वर्थ १००० कोटी रुपये आहे. कंपनी आता परदेशातही आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. (Businessman Success Story)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.