Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, सलग चारवेळा अपयश; शेवटच्या प्रयत्नात UPSC क्रॅक; फॅक्टरी कामगाराची लेक झाली IPS

Success Story of IPS Mohita Sharma: आयपीएस मोहिता शर्मा या अनेकदा चर्चेत असतात. त्यांनी पाचव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी खूप मेहनत घेतली होती.

Siddhi Hande

IPS मोहिता शर्मा यांचा प्रवास

सलग चारवेळा अपयश, पाचव्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक

घरची परिस्थिती बेताची तरी मोठ्या जिद्दीने केली यूपीएससी क्रॅक

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु आयुष्यात कितीही अपयश आले तरीही हार मानायची नाही, असंच काहीसं मोहिता शर्मा यांनी केलं. मोहिता शर्मा यांनी आपल्या शेवटच्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

पाचव्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक

मोहिता शर्मा यांची परिस्थितीत फार चांगली नव्हती.परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांना कधीच शिक्षणात कोणतीही अडचण येऊ दिली नाही. मोहिता शर्मा यांनीदेखील खूप अभ्यास केला आणि यूपीएससी परीक्षा दिली. त्या आयपीएस अधिकारी झाल्या. पाचव्या प्रयत्नात त्या आयपीएस अधिकारी झाल्या.

मोहिता शर्मा या मूळच्या हिमाचलच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडील मारुती कंपनीत काम करायचे. परिस्थिती एवढी चांगली नव्हती. परंतु मोहिता यांनीदेखील खूप मेहनत घेतली. यूपीएससी परीक्षेत सलग चारवेळा अपयश येऊनदेखील त्यांनी हार मानली नाही.त्यांनी मोठ्या जिद्दीने पुन्हा परीक्षा दिली आणि यूपीएससी परीक्षा पास केली.

मोहिता यांचे शिक्षण

मोहिता यांनी दिल्ली पब्लिक स्कूलम द्वारका येथून शिक्षण घेतले. त्यांनी भारतीय विद्यापीठ कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनियरिंग केले. त्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांना या प्रवासा अनेक अडचणी आल्या. परंतु त्यांनी तरीही आपले प्रयत्न सोडले नाही.

मोहिता शर्मा यांनी सेल्फ स्टडी करुन यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास केला. त्या परीक्षेसाठी नोट्स बनवायच्या. त्यांनी खूप अभ्यास केला आणि त्या मेहनतीचे त्यांना फळ मिळाले. मोहिता शर्मा यांनी कौन बनेगा करोडपती सीझन १२मध्ये १ कोटी रुपये जिंकले होते. त्या अनेकदा चर्चेत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात 394 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही, धक्कादायक आकडेवारी समोर

Gold Rate Today: खुशखबर! दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Raigad Crime: घरात एकटी असल्याचे पाहून घुसला, १० वर्षीय मुलीवर बलात्कार; रायगड हादरले

Raj Thackeray : राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, महापालिका निवडणुकीवर होणार चर्चा? | VIDEO

Box Office: 'कंतारा चॅप्टर १' की 'SSKTK' बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? वाचा पहिल्या दिवसाचं कलेक्शन

SCROLL FOR NEXT