Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: CA झाला, अमेरिकेतील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी धुडकावली, पहिल्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS केशव गोयल यांचा प्रवास

Success Story of Keshav Goel: केशव गोयल यांनी खूप कमी वयात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी आधी सीएची परीक्षा पास केली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला आणि ते आयएएस झाले.

Siddhi Hande

पहिल्यांदा चार्टर्ड अकाउंटंट झाला

अमेरिकेतील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी धुडकावली

पहिल्याच प्रयत्नत केली UPSC क्रॅक

IAS केशव गोयल यांचा प्रवास

प्रत्येकाची आपल्या आयुष्यात काही न काही स्वप्ने असतात. अनेकदा काही कारणांनी स्वप्ने पूर्ण होत नाही. परंतु तुम्ही वयाच्या कोणत्याही वर्षी स्वप्ने पूर्ण करु शकतात. यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. असंच स्वप्न केशव गोयल यांनी पाहिलं आणि त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक करु शकतात.

केशव गोयल यांनी सुरुवातीला चार्टर्ड अकाउंटट (CA) परीक्षा पास केली. त्यांनी १८वी रँक प्राप्त केली होती. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षादेखील क्रॅक केली. केशव गोयल यांनी सांगितले की, सीए हे फक्त त्यांनी करिअर ऑप्शन म्हणून निवडले होते. परंतु त्यांनी एक दिवस खूप विचार केली की, आपले आयुष्यात लक्ष्य काय आहे. त्यानंतर त्यांनी ३ महिन्याची सुट्टी घेतली आणि आत्मनिरीक्षण केले.

सीए करुन आयुष्यात काही होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी काहीतरी वेगळे करायचे ठरवले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. केशव गोयल यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी २१४ रँक प्राप्त केली.

अमेरिकेतली लाखो रुपयांच्या पगाराची नोकरीची ऑफर धुडकावली

केशव गोयल हे सीए झाले. त्यानंतर त्यांना अनेक कंपन्यांकडून लाखो रुपयांच्या पॅकेजच्या नोकरीची ऑफर मिळाली. त्यांना अमेरिका आणि जपानमध्ये ऑफर मिळाली. त्यांनी परदेशातील नोकरी सोडली आणि भारतात पुन्हा शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

केशव यांनी २०१७ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी केली. प्रिलियम्स परीक्षेच्या आधी त्यांनी कोणतीही कोचिंग क्लासेस लावले नव्हते.त्यानंतर त्यांनी खूप मेहनतीने यश मिळवले. त्यांनी दिवसरात्र एक करुन अभ्यास केला आणि यूपीएससी क्लिअर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

SCROLL FOR NEXT