K Jaiganesh Saam Tv
बिझनेस

Success Story: एकदा दोनदा नव्हे ६ वेळा अपयश, हार मानली नाय, UPSC क्रॅक केलीच; IAS के जयगणेश यांचा प्रेरणादायी प्रवास

K Jaiganesh Success Story: अनेकांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न असते. परंतु अनेकदा सतत अपयश येते. असंच अपयश आयएएस के जयगणेश यांना आलं होतं. त्यांनी ७ व्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली.

Siddhi Hande

आयुष्यात प्रत्येक व्यक्ती काही न काही कारणासाठी संघर्ष करत असतो. आयुष्यात कितीही अपयश आले तरीही जो व्यक्ती सतत प्रयत्न करतो तो यशस्वी होतो. असंच काहीस आयएएस के जयगणेश यांच्यासोबत झालं.

के जयगणेश यांचे बालपण खूप गरिबीत गेले. त्यांना सलग ६ वेळा परिक्षेत अपयश आले. त्यांनी आयबीमधील नोकरी नाकारली. त्यांना आयएएस व्हायचे होते. शेवटची त्यांनी ७ व्या प्रयत्नात १५६ रँक मिळवली. आज ते आयएएस अधिकारी म्हणून रुजू आहेत.

के जयगणेश हे मूळचे तमिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्याचे रहिवासी. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती. त्यांचे वडील फॅक्टरीमध्ये कामाला होते. त्यांच्या पगारातून कुटुंबियांचा खर्चदेखील भागत नव्हता. परंतु त्यांनी या परिस्थितीवर मात करण्याचा निर्णय घेतला. (Success Story Of K Jaiganesh)

आयएएस के जयगणेश यांनी आपल्या गावी १०वी पास केली. त्यांनी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंग केले. त्यांनी कॉलेज झाल्यानंतर २५०० रुपयांची नोकरी केली. या पगारातून त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण होत नव्हते. त्यानंतर त्यांनी आयएएस अधिकारी व्हायचे ठरवले. त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली.

देशात लाखो विद्यार्थी यूपीएससी परीक्षा देतात. परंतु पहिल्याच प्रयत्नात खूप कमी लोक यशस्वी होतात.परंतु कितीही अपयश आले तरीही जो व्यक्ती प्रयत्न करतो त्याला यश हे येते. असंच काहीसं के जयगणेश यांच्यासोबत झालं. (K Jaiganesh)

त्यांना यूपीएससी परिक्षेत अनेकदा अपयश आले. त्यांनी ६ वेळा परीक्षा दिली. परंतु सहा वेळा ते अपयशी ठरले. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक दबाव होता. ६ व्या प्रयत्नानंतर त्यांना इंटेलिजेंस ब्युरोमध्ये त्यांची निवड झाली. इंटेलिजेंस ब्युरोची नोकरी केल्यानंतरदेखील त्यांनी यूपीएससी परीक्षा द्यायचे ठरवले. परंतु त्यांनी ७ व्या प्रयत्नात मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी १५६ वी रँक मिळवली.

आयुष्यात प्रत्येकाला कोणत्या न कोणत्या वळणावर अपयश हे येते. प्रयत्न सोडून द्यावेसे वाटतात. परंतु त्या अपयशावर मोठ्या जिद्दीने जो व्यक्ती मात करतो तोच यशस्वी ठरतो. हेच के जयगणेश यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले. (UPSC Success Story)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT