Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: लंडनमधील कोट्यवधींची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS ऑफिसर दिव्या मित्तल यांची यशोगाथा

Success Story Of IAS Divya Mittal: लंडनमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडली अन् स्वप्न पूर्ण करण्यासाठी मायदेशी परतल्या. पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करण्याऱ्या दिव्या मित्तल आहेत तरी कोण?

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परिक्षेसाठी अनेक लोक तयारी करतात. यूपीएससी परीक्षा देणे हे अनेकांचे स्वप्न असते. अनेकजणांनी लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षा दिली आहे आणि सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. असंच काहीसं आयएएस दिव्या मित्तल यांच्यासोबत झालं. दिव्या मित्तल यांनी कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडली अन् यूपीएससी परीक्षा दिली.

यूपीएससी, नागरी सेवा परीक्षा आणि, IIT, IIM साठी CAT या देशातील सर्वात अवघड परीक्षा आहेत. अनेकदा या पैकी एकही परीक्षा उत्तीर्ण करता येत नाही. परंतु दिव्या मित्तल यांनी या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.

दिव्या मित्तल कोण आहेत? (Who Is Divya Mittal)

दिव्या मित्तल या मूळच्या हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी(UPSC) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यावेळी त्या आयपीएस म्हणून कार्यरत आहेत. मात्र, आयएएस होण्याचे स्वप्न पाहून त्यांनी दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यांनी ६८ रँक मिळवली.

दिव्या मित्तल यांनी आयआयटी दिल्लीतून (IIT Delhi )अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.दिव्या यांनी कॅट परीक्षा उत्तीर्ण करुन आयआयएम बंगळुरुमध्ये (IIM Bengluru) प्रवेश घेतला.यानंतर त्यानी एमबीए (MBA )पूर्ण केले. यानंतर दिव्या यांनी लंडनमध्ये चांगल्या पॅकेजची नोकरी (Job In London )मिळवली.मात्र, काही काळानंतर त्यांना आयएएस (IAS) होण्याचे स्वप्न पूर्ण करावेसे वाटले. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली अन् भारतात परतल्या.

आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फोनपासून दूर राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. तुम्ही कितीही लाखो रुपये कमवत असाल तरीही स्वतः चे स्वप्न पूर्ण करावे, हे दिव्या मित्तल यांनी सर्वांना सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT