Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: बाईपण भारी देवा! गृहिणी ते डीएसपी; संसारचा गाडा ओढत स्पर्धा परीक्षेत यश; अंजू यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of DSP Anju Yadav: डीएसपी अंजू यादव यांचा प्रवास हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांनी संसार आणि मुलांचा सांभाळ करत स्पर्धा परीक्षा दिली. त्यांनी या परीक्षेत यश मिळवलं आणि त्या डीएसपी म्हणून कार्यरत आहेत.

Siddhi Hande

डीएसपी अंजू यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

गृहिणी ते डीएसपीपर्यंतचा प्रवास

मुलांचा सांभाळ करत दिली स्पर्धा परीक्षा

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. परंतु प्रत्येकाला यश मिळवण्यासाठी काही न काही संघर्ष करावा लागतो. प्रत्येकाचा प्रवास हा खडतर असतो. दरम्यान, असंच काहीसं डीएसपी अंजू यादव यांच्यासोबत झालं. त्यांनी खूप संघर्षातून हे यश मिळवले आहे. त्या आता पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

अंजू यादव यांचा प्रवास खूपच खडतर होता. घर, संसारात रमलेल्या एका स्त्रीने आयुष्यात काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी खूप मेहनतदेखील घेतली. अंजू यादव यांचा प्रवास खूपच वेदनादीय होता. त्यांना या प्रवासात अनेक अडचणी आल्या. त्यांचे स्वप्न फार मोठे नव्हते. त्यांना फक्त आपल्या मुलाला आणि स्वतःला सन्मानाने मोठे करायचे होते.

अंजू यादव या एक सामान्य गृहिणी होत्या. त्यांचा जन्म १९८८ रोजी हरियाणात झाला.त्यांचे वडील शेती करायचे. तर आई घर सांभाळायची. त्यांची आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नव्हती.

२१ वर्षी अंजू यांचे लग्न झाले. २४ व्या वर्षी त्या ई झाल्या. त्यांच्यावर खूप जबाबदारी आहे. त्यांच्या पतीने त्यांची साथ दिली नाही. त्यामुळे त्या पुन्हा माहेरी आल्या. त्यांनी गावातील सरकारी शाळेतून १२वीपर्यंतचे शिक्षण केले. त्यानंतर ग्रॅज्युएशन केले. यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी सरकारी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली.

राजस्थान आयोगाची परीक्षा केली पास

२०२१ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. संपूर्ण घराची आणि मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांनी काहीतरी करण्याचे ठरवले. त्यांनी राजस्थान प्रशासनिक सेवेचा फॉर्म भरला. त्यांनी सतत प्रयत्न केले. २०२३ मध्ये त्यांना यशदेखील मिळाले. पुढे त्या डीएसपी म्हणून कार्यरत झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : स्वयंपाक करताना या ५ स्मार्ट टिप्स वापराच, काम होईल झटपट

Manikrao Kokate Resignation : अटक होणार समजताच माणिकराव कोकाटेंचा BP वाढला, श्वास घेण्यास अडचण; थेट रूग्णालयात दाखल

Famous Director Son Death : प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ४ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू, लिफ्टमध्ये अडकला अन्...

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत बिबट्याची दहशत ,एका रात्रीत चार गुरांना केलं ठार

Thane Metro 4: मुहूर्त ठरला! कॅडबरी जंक्शन ते गायमुखपर्यंतची ठाणे मेट्रो 4 या दिवशी होणार सुरु; कोणत्या स्थानकावर थांबणार?

SCROLL FOR NEXT