Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: डॉक्टर बनली, UPSC परीक्षेत मिळवलं यश; साडेसात वर्षे IAS पदी काम केल्यानंतर सोडली नोकरी; डॉ. तनू जैन यांचा प्रवास वाचा

Success Story Of IAS Tanu Jain: आयएएस तनू जैन यांनी मेडिकलचे शिक्षण घेतले. त्या डॉक्टर झाल्या. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. साडेसात वर्षे आयएएस पदी काम केले. त्यानंतर फिल्ड सोडून स्वतः चे कोचिंग क्लास सुरु केले.

Siddhi Hande

देशातील लाखो तरुणांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न असते. आयएएस अधिकारी होण्यासाठी यूपीएससी परीक्षा क्रॅक करावी लागते. परंतु अनेकदा आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो. कितीही अपयश आले तरीही जो व्यक्ती पुन्हा प्रयत्न करतो तो यशस्वी ठरतो. असंच काहीस आयएएस तनू जैन यांच्यासोबत झालं.

आयएएन तनू जैन या डॉक्टर होत्या. त्यांनी मेडिकल फिल्ड सोडून यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी सोडून दुसरंच काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. (Success Story)

डॉ. तनू जैन यांना २०१५ च्या बॅचच्या आयएएस ऑफिसर आहेत. त्या मूळच्या दिल्लीच्या आहेत. त्यांनी सुभारती मेडिकल कॉलेजमधून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये डिग्री प्राप्त केली. त्याआधी त्यांनी कॅम्ब्रिज स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. डॉक्टर असतानाही त्यांनी यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्याच काळात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (Success Story Of IAS Dr Tanu Jain)

तनू जैन यांनी सुरुवातीला फक्त २ महिन्यात अभ्यास करुन प्रिलिमयम्स आणि परीक्षा पास केली. परंतु मेन्स परीक्षेत त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात ६४८ रँक मिळवली.

तनू जैन या आयएएस अधिकारी होत्या. त्यांनी साडेसात वर्षे सरकारी नोकरी केली. परंतु तरीही त्यांनी आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी फुल टाइम टिचिंग करण्यावर फोकस केले. त्यांनी सरकारी नोकरी सोडून शिक्षक होण्याचा निर्णय घेतला.

तनू जैन या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांनी Tathastu-ICS नावाची आयएएस कोचिंगची स्थापना केली. त्या नेहमी तरुणांना चांगला सल्ला देतात. त्यांचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

नवं वर्ष लय 'महाग' जाणार! मोबाइल कंपन्यांचे रिचार्ज २० टक्क्यांपर्यंत वाढणार, 'खिसाफाड' रिपोर्टमधील दाव्यानं यूजर्सना धडकी

Success Story: वडिलांना UPSCत अपयश, लेकीने केले अपूरं स्वप्न पूर्ण; मेडिकलचे शिक्षण सोडून झाल्या IAS अधिकारी

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT