Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: युट्यूब आणि Google वरुन अभ्यास; क्रॅक केली स्पर्धा परीक्षा; पहाडिया समाजातील लेक होणार प्रशासकीय अधिकारी

Success Story of Babita Singh Crack JPSC: काही दिवसांपूर्वी झारखंड लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत बबिता सिंग यांनी ३३७ रँक प्राप्त केली आहे.

Siddhi Hande

  • झारखंडच्या बबिता सिंग होणार सरकारी सेवेत रुजू

  • बबिता यांनी क्रॅक केली झारखंड लोकसेवा आयोगाची परीक्षा

  • युट्यूबवरुन केला होता अभ्यास

प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही अडचणी असतात. परंतु याच अडचणींवर मात करुन जो व्यक्ती सतत प्रयत्न करतो, त्याला नक्कीच यश मिळते. परिस्थिती कितीही खडतर असली तरीही त्यातून मार्ग काढता यायला हवा. असंच काहीसं बबीता सिंह यांनी केलं. त्यांनी खूप मेहनतीचे झारखंड लोक सेवा आयोगाची परीक्षा पास केली. त्यांनी सेल्फ स्टडी करुन हे यश मिळवलं आहे.

झारखंड लोकसेवा आयोगाची परीक्षा केली पास

बबिता या मूळच्या झारखंडच्या रहिवासी. झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील आसनसोल गावच्या त्या रहिवासी. त्यांच्या वडिलांचे नाव बिंदुलाल सिंग असे आहे. त्यांच्या लेकीने झारखंड लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली. २०२३ च्या परीक्षेत त्यांनी ३३७ रँक प्राप्त केली आहे. प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले आहे.

आदिम आदिवासी पहाडिया समाजातील पहिली लेक प्रशासकीय सेवेत रुजू

बबिता सिंग या झारखंड प्रशासकीय सेवेत रुजू होणाऱ्या आदिम आदिवासी पहाडिया समाजातील पहिली मुलगी असतील. त्यांची परिस्थिती खूप बिकट होती. मुलगी पास झाली तेव्हा त्यांच्याकडे मिठाई खरेदी करायलादेखील पैसे नव्हते. त्यामुळे साखर देऊन मुलीचे तोंड गोड केले. परंतु हीच परिस्थिती आता बदलणार आहे. त्यांची लेक प्रशासकीय सेवेत रुजू होणार आहे.

बबिता सिंग या घरात चारही भावंडांमध्ये सर्वात मोठ्या आहेत. त्यांनी दुमका जिल्ह्यातून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बीए डिग्री प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न कर म्हणून तिच्यावर दबाव टाकत होते. परंतु त्यांना काहीतरी करायचे होते. त्यांना यशाचे शिखर गाठायचे होते. त्यामुळे त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले.

५-६ तास सेल्फ स्टडी

बबिता यांनी सेल्फ स्टडी करुन हे यश मिळवले आहे. युट्यूब आणि ऑनलाइन वेबसाइटवर जाऊन उपलब्ध माहितीतून त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांनी या परीक्षेत ३३७ रँक मिळवली आहे.

आदिम आदिवासी पहाडिया समुदायात शिक्षणाचा अभाव आहे. येथे मुलींना जास्त शिकवले जात नाही. परंतु आता बबिता या समाजासाठी आदर्श ठरली आहे. तिने मोठ्या जिद्दीने झारखंड लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली आणि हजारो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharur News : पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात टाकली गाडी; गाडीसह व्यापारी गेला वाहून, रिक्षा चालकही वाहिला

Popular Actor : लाइव्ह शोदरम्यान प्रसिद्ध अभिनेता स्टेजवर कोसळला अन्...; प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर ठेवलं

Maharashtra Live News Update: मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये 9 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सोन्याला चकाकी; २४ कॅरेट १० तोळं सोन्याचा भाव किती? वाचा लेटेस्ट दर

Shocking News: कार पार्क करून बाहेर आला अन् खाली कोसळला, ७ सेकंदात तरुणाचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT