Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story : मुलासाठी आईने सरकारी नोकरी सोडली, चौथी फेल लेक झाला IRS अधिकारी, चौथ्या प्रयत्नात UPSC केली क्रॅक

Success Story of Sidharth Krishna: सिद्धार्थ क्रिष्णा यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. ते चौथीत फेल झाले होते. त्यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

IRS सिद्धार्थ कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

चौथ्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक

चौथीत झाले होते नापास

मोठ्या जिद्दीने क्रॅक केली यूपीएससी

यूपीएससी परीक्षा पास करुन आयएएस, आयपीएस होण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी लाखो तरुण दरवर्षी खूप मेहनत घेतात. ही परीक्षा कोणीही क्रॅक करु शकतात फक्त तुमच्याकडे इच्छाशक्ती आणि मेहनत करायची ताकद असायला हवी. असंच काहीसं सिद्धार्थ कृष्णा यांनीदेखील केलं. कितीही अपयश आले तरीही त्यांनी आपल्या प्रयत्नांवर त्याचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही.

चौथ्या प्रयत्नात मिळाले यश

प्रयत्न करणाऱ्यांना कधीही अपयश येत नाही, असं म्हणतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिद्धार्थ कृष्णा. सिद्धार्थी यांनी यूपीएससी २०२४ मध्ये यश मिळवले. त्यांनी ६८० रँक प्राप्त केली. त्यांची IRS पदावर निवड झाली.

सिद्धार्थ क्रिष्णा यांनी सेल्फ स्टडी आणि ग्रुप डिस्कशनवर जास्त लक्ष दिले. त्यांनी आयआयटी खरगपुरमध्ये मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. इंजिनियरिंग करतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांचे शालेय शिक्षण मुजफ्फरपुरमधील के डी ए वी शाळेत झाले.

चौथीत झाले होते फेल

सिद्धार्थ यांचे वडील पोलिस आहेत. तर आई सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. त्यांचे आईवडील दोघेही सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे मुलाला शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये ठेवले होते. दरम्यान, मुलगा चौथीत फेल झाल्याने त्यांच्या आईला खूप धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २००४ मध्ये राजीनामा दिला आणि मुलाला पुन्हा घरी बोलवून घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचा अभ्यास घेतला. आईला यश मिळाले. त्यांच्या मुलाने त्यानंतर खूप मेहनत घेऊन अभ्यास केला आणि त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Divorce : प्रसिद्ध अभिनेत्रीचा 16 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर शेअर केली भावुक पोस्ट

Pune Politics: पुण्यात राजकीय भूकंप! शरद पवारांना मोठा धक्का, प्रशांत जगताप यांचा राजीनामा

Ring Design : अंगठ्यांचे हे 5 लेटेस्ट डिझाईन्स; हातात घालताच प्रत्येकजण विचारेल, "कुठून घेतली?"

ठाकरे बंधूंची युती कधी होणार? संजय राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला|VIDEO

Bananas for diabetic patients: डायबेटिस पेशंटनं रोज केळी खावीत आणि किती खावीत? ब्लड शुगर वाढते? सगळ्या प्रश्नांचं १ उत्तर अन् दूर होतील सगळे गैरसमज

SCROLL FOR NEXT