crorepati Chaatwala google
बिझनेस

Success Story: २ रुपयांनी सुरुवात; आता BMWमधून प्रवास; 'करोडपती चाटवाला' नेमका आहे तरी कोण? वाचा सक्सेस स्टोरी

Viral Crorepati Chaatwala Mukesh Sharma Success Story: एकेकाळी दोन रुपयांपासून सुरुवात केली, आज चक्क बीएमडब्ल्यूमधून सफर, दिल्लीच्या या करोडपती भेळवाल्याची कहाणी तुम्हालाही प्रेरित करेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतात स्ट्रीट फूड म्हटंल की, पाणी पुरी, शेवपुरी आणि भेळ ही नाव सगळ्यांच्याच तोंडी येतं. चटपटीत स्ट्रीट फूडची चव सगळ्यांनाच आवडते. पाणी पुरी असो की भेळ पुरी की शेव पुरी याची किंमत सहसा १०० रुपयांपेक्षा कमी असते. परंतु तुम्ही कधी अशा भेळवाल्याबद्दल ऐकले आहे का, जो भेळ विकून चक्क कोटींमध्ये कमाई करतो. ही व्यक्ती अजून कोणी नसून मुकेश शर्मा आहेत. मुकेश शर्मा दिल्लीच्या नेहरू प्लेस आणि टेक मार्केटच्या गर्दीत, एक छोटासा भेळचा स्टॉल चालवतात. मुकेश शर्मा यांना लोक करोडपती चाटवाला म्हणून देखील ओळखतात.

एक स्वप्न, एक कार अन् मेहनतीले बनला 'करोडपती चाटवाला'

मुकेश शर्मा यांनी १९८९ मध्ये आपला प्रवास सुरू केला. त्यांच्याकडे मोठे दुकान नव्हते, फक्त एक टेबल, एक कार आणि एक स्वप्न होते ते म्हणजे लोकांना चविष्ट चाट खाऊ घालणे. त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या जुन्या रेसिपीचा वापर करून दही भल्ले बनवायला सुरुवात केली. त्यावेळी एका प्लेटची किंमत फक्त २ रुपये होती. आज तीच प्लेट ४० रुपयांना विकली जाते. त्यांचा हा चाट स्टॉल दिल्लीतील सर्वात प्रसिद्ध फूड स्टॉलमध्ये गणला जातो.

चवीचे रहस्य आणि प्रेरणादायी प्रवास

मुकेश शर्मा हे आपल्या दही भल्ल्यासाठी लागणारे दही स्वतः च घरी बनवतात. जेणेकरुन त्याची चव एकदम क्रिमी आणि ताजे राहते. याशिवाय, त्यांनी बनवलेले प्रत्येक स्पेशल मसाले त्यांच्या भेळला चविष्ट बनवतात. त्यांच्या मेहनतीमुळे आणि चवीबद्दलच्या आवडीमुळे ते सामान्य भेळवाल्यांपेक्षा वेगळ्या स्तरावर पोहोचले. इतर भेळवाल्यांप्रमाणे, शर्माजींनी कधीही स्वतःचे कायमचे दुकान बनवले नाही. ते दररोज त्यांच्या कारमध्ये तर चक्क कधीकधी बीएमडब्ल्यूमधून स्टॉलसाठी लागणारे सर्व साहित्य आणतात आणि रस्त्याच्या कडेला स्टॉल लावतात. दररोज हजारो लोकांना ते भेळ खाऊ घालतात. लोक त्यांच्या दही भल्लाची चव चाखण्यासाठी लांबून येतात. त्यांच्या स्टॉलवर दही भल्ले खाण्यासाठी नेहमीच लोकांची गर्दी असते.

सोशल मीडियावर झाले व्हायरल इंटरनेट सेन्सेशन

मुकेश शर्माजींचा साधेपणा, स्वच्छता आणि चविष्ट भेळमुळे ते सोशल मीडियावरही प्रसिद्ध झाले. अनेक यूट्यूब चॅनेल आणि इंस्टाग्राम पेजवर त्यांचे व्हिडिओ तूफान व्हायरल झाले. एक साधा भेळवाला कठोर परिश्रमाने कसे कोटी कमवू शकतो आणि आयुष्यात पुढे जाऊ शकतो. हे त्यांनी जगाला दाखवून दिले. लोक त्यांच्या या मेहनत आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या कहाणीकडे प्रेरणा म्हणून पाहतात. आता, मुकेश शर्माजींच्या स्टॉलवर केवळ दही भल्लेच नाही तर पाणी पुरी, समोसे आणि इतर अनेक स्ट्रीट फूड देखील मिळतात. येथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक प्लेटमध्ये चवीसोबतच एक हास्यही मिळेत जे लोकांना पुन्हा पुन्हा तिथे येण्यासाठी आकर्षित करते.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT