Success Story Saam TV
बिझनेस

Success Story: अवघ्या १३ वर्षांचा मुलगा कंपनीचा CEO; वाचा भारतातील बुद्धीमान पठ्ठ्याची कहाणी

Young CEO of India: आदित्यन ९ वर्षांचा असताना त्याने स्वत:च एक अॅप बनवलं होतं. त्यानंतर १३ वर्षांत त्याने स्वत:ची एक कंपनी सुरू केली आहे.

Ruchika Jadhav

Success Story of Yonugest CEO From India Aadithyan Rajesh: शाळेत शिकणारी मुलं आपल्या अभ्यासासह बाहेर फिरणे, फोनवर गेम खेळणे, आपली पॉकेटमनी कशी वाढेल यावर विचार करत असतात. मात्र केरळच्या एका शाळकरी मुलाने सर्वांना थक्क करणारी कामगिरी केली आहे.त्याच्या बौद्धिक कौषल्याने सध्या हा १३ वर्षांचा मुलगा एका कंपीचा CEO आहे. या पठ्ठ्याच्या कामाचं आणि बुद्धीचं सर्वच स्थरांतून कौतुक होत आहे.

आदित्यन राजेश असं या मुलाचं नाव असून तो मुळचा केरळमधील आहे. त्याने आयटी ऑन्ट्रप्रनरच्या रुपात यशाचा डोंगर पार केला आहे. सध्या तो दुबईमध्ये राहतो आणि येथे वेब डिजाइन अँड डेव्हलपमेंटमध्ये अग्रेसर असलेल्या ट्रिनेट सोल्यूशन या कंपनीचा संस्थापक तसेच मालक आहे.

लहानपणापासून आदित्यनला तंत्रज्ञानाची आवड आहे हे त्याच्या आई वडिलांना समजलं होतं. तो फक्त ५ वर्षांचा असताना त्याने आपल्या कंप्यूटरमध्ये इंटरेस्ट डेव्हलप केलं होतं. इतकंच नाही तर तो ९ वर्षांचा असतानाच त्याने स्वत:च्या बुद्धीने एक मोबाइल अॅप सुरू केलं होतं.

आदित्यनच्या वयाची अन्य मुलं अभ्यास आणि आपलं बालपण एन्जॉय करतात. शाळेतून मिळणारा अभ्यास सुद्धा या मुलांना जास्त जड वाटतो. अशा वयात आदित्यन याने आपल्या अभ्यासाचा कामामध्ये कधीही अडथळा निर्माण होऊ दिलेला नाही. आदित्यनची ट्रिनेट सॉल्यूशन ही कंपनी फक्त वेबसाइट आणि अॅप्लिकेशन डिझाइन करत नाही तर ग्राहकांना आयटी सोल्यूशन सुद्धा प्रदान करते.

युट्यूबर म्हणूनही आहे प्रसिद्ध

आदित्यन कंपनीचा मालक असून त्याने 'ए क्रेज'सह यूट्यूबच्या दुनियेत सुद्धा आपलं पाऊल ठेवलं आहे. या चॅनलवर तो टेक्नोलॉजी, कोडिंग, गेमिंग आणि वेब डिजाइन बद्दल त्याच्याकडे असलेलं ज्ञान शेअर करत असतो.

आदित्यच्या या कंपनीचे अद्याप रजिस्ट्रेशन झालेले नाही. तीन शाळेतील मित्रांसह त्याने ही कंपनी सुरू केली असून आतापर्यंत १२ हून अधिक क्लाएंटचे काम कंपनीने पूर्ण केले आहे. सध्या आदित्यन त्याच्या शाळेतील टिचरसाठी डिजाइन केलेल्या क्लास मॅनेजमेंट अॅपवर काम करत आहे. त्याची ही कंपनी भविष्यात ग्लोबल लेवलवर काम करेल असं त्याचं स्वप्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा,पोलीस ठाण्याबाहेर आमनेसामने

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT