मुंबई : आज सकाळी शेअर बाजाराने अचानक जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. निफ्टी ५० ने ३५० अंकांनी उसळी घेतली. तर सेन्सेक्सने १२०० अंकांनी उसळी घेतली. निफ्टी ३४८.४० अंकांनी उसळी घेऊन २४,८१५.८५ वर पोहोचला. तर टॉप ३० बीएसई सेन्सेक्सने १३३८.८४ अंकानी उसळी घेऊन ८२,२९५.१७ स्तरावर पोहोचला.
बीएसई सेन्सेक्सच्या टॉप ३० शेअरविषयी बोलायचं झालं तर, एनटीपीसीचे शेअर सोडून सर्व शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली. Infosys, Titan आणि TCS च्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली. बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांनी तेजी दिसली.
आयटी, ऑइल आणि बँकिंग शेअर्समध्ये जोरदार उसळी आल्याने शेअर बाजारात तेजी आल्याचं बोललं जात आहे. टीसीएस, इन्फोन्सिस आणि रिलायन्सच्या शेअरनेही खास कमाल केली. एनएसईवरही आज २,८२५ शेअरपैकी १५४४ शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर ११९९ शेअरमध्ये पडझड पाहायला मिळाली. ८२ शेअर्स स्थिर होते. १०४ शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर होते. ८ शेअर ५२ आठवड्यांच्या निचांकी स्तरावर होते. ११९ शेअर अपर सर्किट आणि २७ शेअर लोअर सर्किटमध्ये दिसून आले.
महाराष्ट्र सीमलेसचे शेअरमध्ये १४.५७ टक्क्यांनी वाढ होऊन ७६२.८० वर पोहोचले.
सीडीएसएलचे शेअर ८ टक्क्यांनी वाढून १९०० रुपयांपर्यंत पोहोचले.
कल्पतरु प्रोजेक्टचे शेअर ७ टक्क्यांनी वाढून १२४७ वर पोहोचले.
फिनोलेक्सचे शेअर ७ टक्क्यांनी वाढून १३११ वर पोहोचले.
बीएसईचे शेअर १२ टक्क्यांनी वाढून ५२००वर पोहोचला.
इंद्रपस्त्र गॅसचा शेअर ८ टक्के, टाटा एलेक्सीचा शेअर ४ टक्के, झोमॅटोचे शेअर ४ टक्के, बोशचे शेअर ३ टक्के आणि संवर्धन मदरचे शेअर ३.५ टक्क्यांनी उसळी घेतली.
शेअर बाजारात आयटी सेक्टरचे शेअर, इन्फोसिस, टीसीएसचे शेअरने उसळी घेतल्याने अचानक तेजी दिसून आली. तसेच गुंतवणूदारांनी शेवटी जोरदार खरेदी केल्याचाही परिणाम असल्याचं बोललं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.