stock market  Saam tv
बिझनेस

Share Market : शेअर बाजार पुन्हा चमकला; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी, कोणते शेअर ठरले टॉप गेनर?

Share Market update : शेअर बाजार पुन्हा चमकला आहे. बऱ्याच दिवसानंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज कोणते शेअर टॉप गेनर ठरले. जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

शेअर बाजार बऱ्याच दिवसांनी ग्रीन झोनमध्ये दिसत आहे. शेअर बाजारातील सेन्सेक्सची वाढ गुंतवणूकदारांना काही प्रमाणात दिलासा देणारी आहे. गेल्या काही सत्रांपासून शेअर बाजार रेड झोनमध्ये होता. महाशिवरात्रीआधीच शेअर बाजारात मंगळवारी तेजी पाहायला मिळत आहे. आज सकाळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सेन्सेक्स २०० तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीने ३० अंकांनी उसळी घेतली.

शेअर बाजार ट्रॅकवर?

शेअर बाजार पुन्हा एकदा ट्रॅकवर आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, आर्थिक तज्ज्ञ यावर भाष्य करताना दिसत नाही. ग्लोबल ब्रोकरेज फर्म सिटीने (Citi) नुकसानाच्या भरपाईची टाइमलाईन सांगितली आहे. ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत निफ्टी २६००० पर्यंत आकडा गाठला जाण्याची शक्यता आहे. सध्या निफ्टी २२,५८८.५० वर आहे.

मागील ५ महिन्यात सेन्सेक्स १०००० अंकांनी घसरला. निफ्टी किमान ४००० अंकांनी घसरला. निफ्टी डिसेंबरपर्यंत नव्या विक्रमावर पोहोचू शकतो. ब्रोकरेज सिटीच्या म्हणण्यानुसार, इनकम टॅक्समध्ये सूट आणि रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात केल्याने काही प्रमाणात शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सीटी (CITI) नुसार, भारतीय शेअर बाजारात तेजीची चाहूल आहे. निफ्टी डिसेंबरपर्यंत २६००० पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. तर बीएसई सेन्सेक्स सप्टेंबर २०२४ पर्यंत ८६००० पर्यंत पोहोचला होता. निफ्टी २६,३०० पर्यंत पोहोचला होता. त्यानंतरही शेअर बाजारावर दबाव पाहायला मिळत आहे.

निफ्टीचे टॉप गेनर्स

आज मंगळवारी निफ्टी ऑटो इंडेक्समध्ये ०.८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. निफ्टी मेटल आणि बँक इंडेक्स रेड झोनमध्ये आहेत. निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्समध्ये ०.०५ टक्क्यांनी तेजी पाहायला मिळत आहे. निफ्टी टॉप गेनरमध्ये आज M&M, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स आणि Adanient सामील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

SCROLL FOR NEXT